ETV Bharat / city

विशेष : प्लास्टिक पतंग अन् नायलॉन मांजामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोक्याबरोबर प्रदूषणात वाढ

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अन्य शहरांप्रमाणेच नागपुरातील बाजारही रंगबेरंगी पतंगांनी व विविध प्रकारच्या मांजाने सजलेला आहे. प्रशासनाने नायलॉन मांजाविरोधात कडक मोहीम राबवूनही अनेक ठिकाणी प्लास्टिक पतंग व नायलॉन मांजाची सर्रास विक्री होताना दिसत आहे. यावर पर्यावरणप्रेमींनी अनेक वेळा आक्षेप घेतला आहे.

author img

By

Published : Jan 13, 2021, 7:28 PM IST

plastic-kite-and-nylon-thred
plastic-kite-and-nylon-thred

नागपूर - मकर संक्रांतीच्या निमित्ताने नागपूरच्या सक्करदरा परिसरात असलेलं प्रसिद्ध पतंग बाजार रंगीबेरंगी आणि आकर्षक रूपातील पतंगांनी आणि विविध प्रकारच्या मांजानी सजलेले आहे. या बाजारात सर्रासपणे प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. प्लास्टिक पतंगाच्या सर्रास विक्रीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. या संदर्भात शासन आणि प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नसल्यामुळेच प्लास्टिक पतंग आणि मांजाची विक्री शक्य असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

मकर संक्रांतीच्या आठ दिवस आधीपासून उपराजधानी नागपुरात पतंगबाजीला सुरुवात होते, तर २६ जानेवारीपर्यंत पतंगबाज आपली हौस भागवून घेतात. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे याही वर्षी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पतंग उपलब्ध झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्लास्टिक पतंगाचा समावेश आहे. प्लास्टिकचे पतंग पर्यावरणासाठी हानिकारक आहेत, या संदर्भात कधीही जनजागृती करण्याचा प्रयत्न होत नसल्याने सर्रासपणे आणि कोणत्याची अडचणींशीवाय प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. यावर पर्यावरणप्रेमींनी अनेक वेळा आक्षेप घेतला मात्र त्यांच्या मुद्याकडे लक्ष देण्यासाठी संबंधितांकडे वेळच नाही.

नायलॉन मांजाविरुद्ध पर्यावरणप्रेमी संतप्त
नॉन बायो डिग्रीडेबल असल्याने पर्यावरणाचा रास होतोय -
बाजारात ज्या प्रकारच्या प्लास्टिक पतंग उपलब्ध आहेत त्या तयार करण्यासाठी सिंगल युजेस प्लास्टिकचा उपयोग केला जातो. हे प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक समजलं जातं. शिवाय नायलॉन मांजा म्हणजे एका प्रकारे प्लास्टिकचा दोरा असल्याने तो देखील आपल्या पर्यावरणासाठी घातकच आहे. प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा अनेक दशके नष्ट होत नाहीत. प्लास्टिक नॉन बायो डिग्रीडेबल असल्याने ते नष्टच होत नाहीत, त्यामुळे ड्रेनेज सिस्टममध्ये जाऊन ते समस्या निर्माण करत असल्याची माहिती पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.
नायलॉन मांजामुळे पशू आणि पक्षांच्या जीव धोक्यात -
नायलॉन मांजामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेले आहेत त्यामुळे केवळ नागपुरातच नाही तर राज्याच्या विविध भागात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरही नागपुरात तीन घटना नायलॉन मांजामुळे घडलेल्या आहेत यामध्ये हे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. एवढंच काय तर नायलॉन मांजा पक्ष्यांच्या जीवावर उठलेला आहे. निसर्गाचा समतोल राखणारे पशुपक्षी स्वच्छंद आकाशी भरारी घेत असताना नायलॉन मांजामुळे त्यांना देखील आपला जीव गमवावा लागतोय आणि ही संख्या संक्रांतीच्या काळात हजारोंच्या घरात असते.
प्लास्टिक पतगांची होते चोरी-छिपे विक्री -
पतंग बाजारात तुम्हाला दिसतील त्या कागदाच्या पतंगी आहेत. मात्र तुम्ही त्या दुकानदाराकडे आग्रह धरला तर तो दुकानदार तुम्हाला अगदी आरामात प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा उपलब्ध करून देतो. केवळ पोलीस आणि महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या भीतीमुळे हे दुकानदार आपल्या दुकानात प्लास्टिक पतंग आणि मांजा विक्रीकरिता ठेवत नाहीत. मात्र तुम्हाला हवा असेल तर ते तुम्हाला उपलब्ध देखील करून देतात. या संदर्भात अनेक तक्रारी महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई केल्यामुळे आज बाजारात केवळ ताव ( कागद) पतंग उपलब्ध असल्याचं दिसून येत आहे, मात्र आतून प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा उपलब्ध करून दिला जातोय.
निर्मात्यांवर कारवाई कधी झालीच नाही -
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे ती केवळ विक्रेत्यांवर होताना आपल्याला दिसते आहे. मुळात ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा तयार केला जातो. त्यांच्यावर आजपर्यंत कोणीही कारवाई केल्याचा इतिहास नाही, त्यामुळे प्रशासनाकडून मी मारल्यासारखा करतो आणि तू रडल्यासारखे कर अशाच प्रकारची कारवाई सुरू असल्याचे आपल्याला बघायला मिळतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.