ETV Bharat / city

Nagpur Nude Dance Case :- उमरेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला बेफिकीरी भोवली,अधीक्षकांनी केली उचलबांगडी

नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर ( SP Vijaykumar Magar action in Umared program ) यांनी उमरेड विवस्त्र डान्स प्रकरण ( Umared Nude Dance matter ) गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात आयोजकांसह एकूण 12 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांची ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात ( Transfer of PI Yashwant Solase ) बदली करण्यात आली आहे.

author img

By

Published : Jan 27, 2022, 2:56 PM IST

Updated : Jan 27, 2022, 3:08 PM IST

Nagpur Nude Dance Case
उमरेड विवस्त्र डान्स प्रकरण

नागपूर - उमरेड विवस्त्र डान्स प्रकरण ( Umared Nude Dance matter ) हे स्थानिक पोलिसांच्या अंगलट आले आहे. पोलीस अधिक्षकांनी उमरेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत सोळसे ( Transfer of PI Yashwant Solase ) यांची उचलबांगडी केली आहे.

नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर ( SP Vijaykumar Magar action in Umared program ) यांनी उमरेड विवस्त्र डान्स प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात आयोजकांसह एकूण 12 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांची ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. विवस्त्र डान्स प्रकरणाकडे पोलीस निरीक्षक सोळसे यांची अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. यशवंत सोळसे यांच्याजागी प्रमोद घोंघे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रकरणात ब्राम्हणी गावाच्या उपसरपंचालासुद्धा अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-Nagpur Nude Dance Case : अश्लील विवस्त्र नृत्य प्रकरणात आयोजकांसह कलाकारांवर गुन्हा दाखल; तिघांना घेतले ताब्यात

पोलिसांच्या नाकावर टिच्चून कार्यक्रमाचे आयोजन

गेल्या आठवड्यात उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावात डान्स हंगामा नामक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांनी अश्लीलतेचा कळस गाठत विवस्त्र डान्स केल्याचे व्हिडीओ वायरल झाला होता. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. डान्स हंगामा या कार्यक्रमाची पोलीस निरीक्षकांसह ठाण्यातील एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला माहिती नव्हती. पोलिसांच्या नाकावर टिच्चून आयोजन करण्यात आलेल्या अश्लील कार्यक्रमाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

ब्राम्हणी गावाच्या उपसरपंचालासुद्धा अटक

हेही वाचा-Nude Dance Nagpur : सकाळी शंकरपट, रात्री 'आशिक बनाया अपने'; डान्स हंगामाच्या तिघांवर गुन्हा दाखल

आयोजक मंगेशला 5 पर्यत न्यायालयीन कोठडी

मंगेश पाटील हा एलेक्स जुली के हंगामे या ग्रुपचा संचालक आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने मंगेशला 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ब्राम्हणी गावचे उपसरपंच रितेश आंबोने याने कार्यक्रमाच्या आयोजना संदर्भात कोणतीही माहिती नव्हती, असे सांगितले होते. मात्र, पोलीस तपासात त्याचा सहभागदेखील होता, हे निष्पन्न झाले आहे. उमरेड पोलिसांनी उपसरपंच रितेश आंबोनेला ( Ritesh Ambone arrest in Brahmni ) अटक केली आहे. रितेशकडून ग्राहकांच्या हातावर मारण्यात आलेले स्टॅम्प सुद्धा जप्त केले आहेत नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रमोद घोंघे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जाणार आहे.

हेही वाचा-Banana Seller Pune : डान्स करुन केळी घेण्याचं आवाहन; पाहा, पुण्यातील केळीवाला...

Last Updated : Jan 27, 2022, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.