ETV Bharat / city

Dengue Patients Increased in Nagpur : नागपुरात कोरोनासोबत आता व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण वाढले, मनपाने सुरू केले घरांचे सर्वेक्षण - डेंग्यूचे रुग्ण

नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये गुरुवारी 4636 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर आज सुद्धा चार हजार घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात ( Dengue Patients Increased in Nagpur ) आहेत.

Dengue Patients Increased in Nagpur
मनपाने सुरू केले घरांचे सर्वेक्षण
author img

By

Published : Jul 8, 2022, 4:03 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपूरात कोरोना सोबतचे आता व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने नागपूर महानगर पालिकेने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली ( Dengue Patients Increased in Nagpur ) आहे. या अंतर्गत शहरातील सर्वच भागातील घरांचे मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू झाले आहे. रोज साधारपणे 4 हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे.

4636 घरांचे सर्वेक्षण - नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये गुरुवारी 4636 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर आज सुद्धा चार हजार घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

128 घरे दुषित आढळली - महानगरपालिकेकडून काल ज्या ४६३६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 128 घरे दुषित आढळली आहेत. म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली आहेत. याशिवाय 05 ताप असलेले रुग्ण देखील आढळून आले आहेत. मनपाच्या चमूद्वारे 70 कुलर्स रिकामी करण्यात आले. 496 कुलर्समध्ये 1 टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 948 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच 89 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

हेही वाचा - MLC Sworn Mumbai : विधान परिषदेच्या दहा नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.