ETV Bharat / city

Buggy Service in Mumbai: खुशखबर; आता व्हिक्टोरिया बग्गी  वरळी, वांद्रे आणि चेंबूरमध्ये धावणार!

author img

By

Published : Mar 24, 2022, 7:51 PM IST

Updated : Mar 24, 2022, 8:03 PM IST

ल्या वर्षीपासून दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाला सुरू झाली आहे. या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीला ( Electric Victoria Buggi in Mumbai ) पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता बग्गीची संख्या वाढविण्याचा आणि विस्तार करण्याचा निर्णय उबो राईड्स कंपनीने घेतला आहे. ही माहिती उबर राईड्स कंपनीचे व्यवस्थापन प्रमुख केतन कदम ( Ketan Kadam Uber Rides ) यांनी दिली आहे.

बग्गी
बग्गी

मुंबई- ब्रिटिश काळापासून मुंबई शहराने स्वत:ची संस्कृती आणि वैभव निर्माण केली आहे. त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे ‘व्हिक्टोरिया’ किंवा मुंबईची आबालवृद्धांची आवडती घोडागाडी ( Buggi service in Mumbai ) आहे. या बग्गीची संख्या वाढविण्याचा आणि विस्तार करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

'व्हिक्टोरियात गाडीला चालविण्यासाठी घोड्यांचा वापर होत असल्याने 2015 पासून व्हिक्टोरिया गाड्यांवर बंदी लादण्यात आली होती. गेल्या वर्षीपासून दक्षिण मुंबईत इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाला सुरू झाली आहे. या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीला ( Electric Victoria Buggi in Mumbai ) पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता बग्गीची संख्या वाढविण्याचा आणि विस्तार करण्याचा निर्णय उबो राईड्स कंपनीने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात मुंबईतील वरळी, वांद्रे आणि चेंबूर याठिकाणी पर्यटकांना व्हिक्टोरिया बग्गीतून प्रवास करता येणार असल्याची माहिती उबर राईड्स कंपनीचे व्यवस्थापन प्रमुख केतन कदम ( Ketan Kadam Uber Rides ) यांनी दिली आहे.

हेही वाचा-Param Bir Singh Cases : राज्य सरकारला झटका.. परमबीर सिंगांच्या विरोधातील ५ गुन्हे सीबीआयकडे

व्हिक्टोरिया बग्गी पूर्ण क्षमतेने होणार सुरू-
गेल्या वर्षी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिक्टोरिया बग्गी उद्घाटन झाले होते. काही दिवसातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे व्हिक्टोरिया बग्गीचे चाके बंद करण्यात आले होते. कारण लॉकडाऊनमुळे सायंकाळी चार वाजल्यानंतर मुंबईकरांना बाहेर पडण्यास बंदी होती. त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यातच व्हिक्टोरिया सेवा बंद करावी लागली होती. मात्र, कोरोना नियंत्रण आल्याने आणि पर्यटन स्थळावरील निर्बंध दूर झाल्याने व्हिक्टोरिया बग्गीचे पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे.

हेही वाचा-Prasad Lad In Legislative Council : कॉलेजमध्ये असताना प्रेमप्रकरण करून आमदाराच्या मुलीला पळवून लग्न केले - प्रसाद लाड

आणखी १४ बग्गी सुरू केल्या करण्यात येणार

सध्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया दक्षिण मुंबईतील हॉर्निमल सर्कल, कुलाब्यातील ताज हॉटेल समोर आणि नरिमन पॉईंटला ओबेरॉय हॉटेलसमोरून एकूण सात बग्गी पर्यटकांना सेवा देत आहेत. सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत एका बग्गीचे किमान १० ते १२ फेऱ्या होत आहेत. इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाला पर्यटकांकडून तुफान प्रतिसाद बघता आणखी १४ बग्गी सुरू केल्या करण्यात येणार असल्याची माहिती केतन कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा-धक्कादायक व्हिडिओ..! दैव बलवत्तर, सायकल बसखाली चिरडली पण तो बचावला...
नव्या २० बग्गींचा समावेश-
मुंबईतील पर्यटन भ्रमंती करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हिक्टोरियाला बग्गीची मागणी जास्त आहे. त्यामुळे मुंबईत मे महिन्यापर्यत आणखी नव्या २० बग्गी दाखल होणार आहे. या नव्या बग्गी वरळीतील पोचखानवाला मार्ग, वांद्रे येथील कार्टर रोड आणि चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात प्रत्येकी दोन- दोन तैनात केल्या जाणार आहेत. नव्या व्हिक्टोरियांमध्ये जीपीएसच्या मदतीने ऑडियो टुअरची मजा पर्यटकांना लुटता येणार आहे. या सुविधेमध्ये जीपीएसद्वारे स्थानिक पर्यटन व हेरिटेज स्थळांची वैशिष्ट्ये आणि इतर माहिती ऑडियो स्वरुपात पर्यटकांना ऐकवली जाईल. यामध्ये मराठीसह बग्गीमध्ये हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, बंगाली, फ्रेंच, जर्मन आणि चायनीज अशा विविध भाषांचा समावेश असणार आहे.

या परिसरांची भ्रमंती

दक्षिण मुंबईत व्हिक्टोरियातून हेरिटेज वॉक सेवा सुरू करण्यात आली आहे. सुमारे एका तासाच्या या रपेटमध्ये मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत, सेंट झेवियर्स महाविद्यालय इमारत, बॅलार्ड पियर इस्टेट, काळाघोडा परिसर, प्रिन्स वेल्स म्युझियम, मुंबई विद्यापीठ इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फॅशन स्ट्रीट, ओव्हल मैदान, फ्लोरा फाऊंटन, नरिमन पॉईंट आणि फोर्ट परिसरातील हेरिटेज इमारती पाहता येणार आहेत.

असे आहे व्हिक्टोरिया बग्गीचे दर-
एका व्हिक्टोरियामध्ये सहा पर्यटकांना प्रवास करता येणार आहे. त्यात पर्यटकांना छोटी रपेट आणि मोठी रपेट अशा दोन प्रकारच्या रपेट करता येतील. यामध्ये छोट्या रपेटसाठी एकूण ३०० रुपये आणि मोठ्या रपेटसाठी ५०० रुपये मोजावे लागतील. तसेच व्हिक्टोरिया बग्गीतून मुंबईतील हेरिटेज वॉक करायची असेल तर पर्यटकांसाठी दर ठरविण्यात आले आहे. व्हिक्टोरिया बग्गीतून हेरिटेज वॉकसाठी प्रति व्हिक्टोरिया बग्गी तीन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे.

Last Updated : Mar 24, 2022, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.