ETV Bharat / city

पक्षी होत आहेत नामशेष... ध्वनी प्रदुषणावर वेळीच नियंत्रणाची गरज - noise pollution in nagpur

नागपूर शहरात गेल्या काही महिन्यात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. याचा थेट परिणाम वाढत्या प्रदुषणावर झाला आहे. अशावेळी नियमित दिसणारे पक्षीच नामशेष होत असल्याची माहिती पक्षी तज्ञांनी दिली आहे.

noise pollution affects birds
वाढती वाहनांची संख्या आणि आधुनिकीकरणाच्या प्रणालीचा सर्वात मोठा फटका बसतोय, तो म्हणजे पक्षी आणि प्राण्यांना!
author img

By

Published : Dec 16, 2020, 3:35 PM IST

नागपूर - ज्या पद्धतीने शहरे वाढत चालली आहेत. त्याच पद्धतीने वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. ही वाढती वाहनांची संख्या आणि आधुनिकीकरणाच्या प्रणालीचा सर्वात मोठा फटका बसतोय, तो म्हणजे पक्षी आणि प्राण्यांना! नागपूर शहरात गेल्या काही महिन्यात ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर झाला आहे. अशावेळी नियमित दिसणारे पक्षीच नामशेष होत असल्याची माहिती पक्षी तज्ञांनी दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात ध्वनी प्रदुषण कमी न झाल्यास तुरळक प्रमाणात दिसणारे पक्षी व प्राणी देखील नामशेष होण्याची भीती अभ्यासकांनी वर्तवली आहे.

पक्षी होत आहेत नामशेष... ध्वनी प्रदुषणावर वेळीच नियंत्रणाची गरज

आधुनिकीकरणाचा परिणाम?

आधुनिकीकरणाचा माणसाला फायदा होतोय. प्रत्येक व्यक्ती आनंदमय जीवनशैली अनुभवण्यासाठी धडपड करतोय. मोठ मोठे बंगले, आलीशान गाड्या हे उभारण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातांना दिसून येत आहे. अशावेळी आधुनिकीकरणाच्या दुनियेत सुखात्मक स्वप्न रंगविण्यासाठी निसर्गाला आणि त्यातील घटकांना ध्वनी प्रदुषण मारक ठरत आहे.

ध्वनी प्रदुषणात वाढ व नामशेष पक्षी

अलीकडच्या काळात शहरातील ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे पहायला मिळत आहे. मोठ मोठ्या गाड्यांचा कर्णकर्कश आवाज शहरातील प्राणी व पक्षीसाठी घातक ठरलाय. वाढत्या ध्वनी प्रदुषणामुळे नियमीत दिसणारे पक्षीच आज नामशेष होत असल्याचे चित्र आहे. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात झाडे पहायला मिळतात. परंतु ही झाडं वाढत्या ध्वनी प्रदुषणामुळे पक्ष्यांविनाच आहेत. एकेकाळी सतत किलबिलाट होणाऱ्या या झाडावर आता शुकशूकाट आहे.

noise pollution affects birds
शहरात १० पेक्षा अधिक ध्वनी मापक यंत्र आहेत.
वाहनांची वाढती गर्दी
दुसरीकडे रस्त्यांवरील वाढती वाहनांची गर्दी नियमीत दिसणाऱ्या प्राण्यांवर परिणाम करत आहे. यामुळे ध्वनी प्रदुषणासोबतच वाहनांचा गोंगाटा प्राणी व पक्ष्यांना मारक ठरत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
शहरातील ध्वनी पातळीच्या नियमांचे उल्लंघन
शासनाने घालून दिलेल्या नियमांचा विचार केल्यास ध्वनीपातळी शहरातील औद्योगिक भागात दिवसा ७५ डीबी तर रात्री ७० डीबी, नियमीत भागात दिवसा ६५ तर रात्री ५५ डीबी तर रहदारी भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डीबी इतकी असणे अपेक्षित आहे. मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रहदारी, औद्योगिक, या भागांमधे १०० ते १२० डीबी पर्यत ध्वनीची पातळी जात आहे. त्यामुळे सहाजिकच आहे पक्षी आणि प्राण्यांसाठी ही आकडेवारी घातक ठरत आहे.
लॉकडाऊनच्या काळात झाले होते बदल
तर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन काळात ही पातळी ओसरल्याचे चित्र आहे. लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी ध्वनी पातळी कमी नोंदवण्यात आली. यामुळे पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. मात्र अनलॉक होताच ध्वनी प्रदुषण हळूहळू वाढू लागले आहे. यासाठी शासन व प्रदुषण नियंत्रण मंडळाकडूनही जनजागृतीचे काम सुरू असल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.
शहरातील ध्वनी मापके
शहरात १० पेक्षा अधिक ध्वनी मापक यंत्र आहेत. त्यामुळे वेळोवेळी ध्वनी मापन होत असल्याचेही प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले. असे असले तरी वाढत्या ध्वनी प्रदुषणाला माणूसच जबाबदार ठरत असल्याची प्रतिक्रिया पक्षी अभ्यासकांनी दिली आहे.
म्हणून पक्षांचे स्थलांतर
कर्णकर्कश्श आवाजामुळे पक्षी शहरापासून दुरावत चालले आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात पक्षांचे स्थलांतरण होत असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे. यामुळे ही शहरासाठी व माणसांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अशी भावनाही पक्षी व प्राणी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तसेच वाढत्या वाहनांची संख्या यातील सर्वात मोठा घातक घटक आहे. त्यामुळेच ध्वनी प्रदुषणाचे स्तर वाढल्याचे मतही अभ्यासकांनी मांडले.
या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

अशावेळी नामशेष होत असलेल्या चिमणी, कावळा या प्रजातींना शहरात नियमित पाहायचे असेल तर माणसांनी ध्वनी प्रदुषणाच्या दुष्परिणामाला लवकर समजून जागे होण्याची गरज आहे. त्यामुळे शहरात पुन्हा पक्षांचा व प्राण्यांचा वास्तव अनुभवण्यासाठी ध्वनी प्रदुषण कमी करणे हाच एक उपाय असल्याचे एकंदरीतच स्थितीवरून लक्षात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.