नागपूर - सध्या महिला पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नागपूरच्या 2008 तुकडीच्या आयपीएस अधिकारी नीलांबरी विजय जगदाळे-महाजन पंजाब पोलीस दलात DIG पदी पदोन्नती मिळाली आहे. नीलांबरी यांच्या या अद्वितीय यशामुळे त्यांचे माहेर आणि सासरचे मंडळी आनंदोत्सव साजरा करत आहेत.
ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा नागपूरकर असलेल्या नीलांबरी जगदाळे यांचं संपूर्ण शिक्षण नागपूरला पूर्ण झालेलं आहे. सासर देखील नागपूरचेच आहे. नीलांबरी जगदाळे यांना DIG पदी पदोन्नती मिळाल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीलांबरी जगदाळे या 2008 तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. पंजाबमध्ये त्यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जातं. चंदीगड मध्ये एसएसपी म्हणून पदभार सांभाळणार्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत.
किरण बेदी आदर्श - नीलांबरी जगदाळे या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना आदर्श मानतात. त्यामुळेचं नीलांबरी यांनी यांच्यात असलेल्या जिद्दीला शस्त्र बनवून आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. ध्येय प्राप्तीसाठी त्यांनी मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी देखील सोडली होती. त्यावेळी केलेला त्याग आज नीलांबरी यांना देशसेवेसाठी उपयोगी पडत असल्याची भावना त्यांच्या वडिलांनी आणि आत्याने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Load Shedding Crisis :वीज संकट - उर्जामंत्र्यांचे केंद्रावर खापर, माजी उर्जामंत्री म्हणतात नाचाता येईना अंगण...
वडिलांच्या स्वप्नाला फुटले पंख - नागपूर येथील सामन्य कुटुंबात जन्मलेल्या नीलांबरी जगदाळे यांनी बालपणीच पुस्तकांशी मैत्री केली. घराशेजारचे लहान मुलं खेळत असताना त्या पुस्तकात रमत असे. आई,वडील आणि बहीण असा त्यांचा गोतावळा होता. मात्र, 2004 मध्ये आईचे छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर देखील त्या डगमगल्या नाही. त्यांचे वडील बँकेतून निवृत्त झाले आहेत.
नीलांबरी यांचा शैक्षणिक प्रवास -
नीलांबरी जगदाळे यांचा बहुतांश शिक्षण नागपूरला झालेला आहे. पहिली ते चौथी पर्यंतचे त्यांचे शिक्षण धरमपेठ येथील परांजपे प्रायमरी शाळेत झाले, त्यानंतर पाचवी ते सहावी पर्यंत त्यांनी रामदासपेठ येथील हडस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. सातवी ते आठवी शिक्षण अचलपूर येथील सिटी हायस्कूल मध्ये घेतलं. नववी ते दहावी शिक्षण रवी नगर येथील सीपी अँड बेरार शाळेतून पूर्ण केलं. अकरावी आणि बारावीचं शिक्षण काँग्रेस नगर नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी विआरसी कॉलेज मधून कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यादरम्यान त्यांनी एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी स्वीकारली होती. मात्र, नंतर नोकरी सोडून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. दुसऱ्याचं प्रयत्नात त्या पोलीस अधिकारी झाल्या.