नागपूर : दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी ( Maharashtra Board Examination ) वर्ग न देण्यास शिक्षण संस्था महामंडळ ठाम असल्याचे, महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचे सरकार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर शहरातील दोनशे ते अडीचशे शाळा सदस्यांची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांना बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
रवींद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारला इशारा देऊनही कुठलेच पाऊल न उचलल्याने इमारत न देण्याचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसणार आहे. त्यामुळे राज्य सरकार अनुदान देत नसेल तर आम्ही शाळा देणार ( Maharashtra shikshan sanstha Not Giving Classes ) नाही. कुठल्याही परिणामाला समोर जाण्याची तयारी असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
राज्यातील अनुदानित शाळांना वेतनेत्तर अनुदान दिले जात नाही. त्यामुळे शाळांचा खर्च निघत नाही. महामंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी इमारती आणि इतर सोयी न देण्याचा निर्णय घेतला ( Hsc Ssc Classes Not Given ) आहे. राज्यात सुमारे 64 हजार अनुदानित शाळा आहे. बहुतांश शाळा आमच्यासोबत असल्याचा दावा ही शिक्षण संस्था महामंडळाने केला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्र कुठून आणायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.