नागपूर - नागपूरचे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय तथा मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर आजपासून अनिश्चीतकालीन सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात नागपूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेते यावर आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे.
1 जूनपासून सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मेयो रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी झाली आहे. यामुळे शासनाने निवासी डॉक्टरांना कोविड ड्युटी पासून मुक्त करावे आणि रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराला गती द्यावी, अशी मागणी डॉक्टरांच्या वतीने करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ही मागणी केली जात आहे. पण याकडे दुर्लक्ष होत असल्याने मंगळवार 1 जूनपासून डॉक्टरांद्वारे सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन काय भूमिका घेते यावर आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे.
हेही वाचा - दिलासादायक! राज्यात आज कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणााऱ्यांची संख्या दुप्पट