ETV Bharat / city

सोशल डिस्टन्सचा फज्जा कुणी केला हे आधी तपासा; महापौर जोशींचे 'आप'ला प्रत्युत्तर

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थानात आंदोलन केले होते. त्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्ससिंगचा फज्जा कुणी केला, हे त्यांनी तपासावे असा प्रश्न संदीप जोशी यांनी केला आहे.

आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी
author img

By

Published : Jun 27, 2020, 6:55 PM IST

नागपूर - गेल्या पाच दिवसांपासून नागपूर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू आहे. यामध्ये राज्य शासनाने घालून दिलेले नियम आणि फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापौर संदीप जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा तक्रार अर्ज आम आदमी पक्षाने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. यावर महापौर संदीप जोशी यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. प्रत्येक नगरसेवकाला हॅन्ड सॅनिटाइझर आणि मास्क उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. शिवाय सदस्य आपल्या जागेवरून उठून गेल्यानंतर ती जागा सॅनिटाइझ केली जात असल्याचा दावा महापौर संदीप जोशी यांनी केला. दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थानात आंदोलन केले होते. त्या आंदोलनात फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा कुणी केला, हे त्यांनी तपासावे असे संदीप जोशी म्हणाले.

दरम्यान, नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मध्यंतरी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे सभागृह सोडून निघून गेले होते. त्यामुळे महापौर जोशी आणि आयुक्त मुंढेंचा वाद चांगलाच रंगला होता.

महापौर संदीप जोशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.