नवी दिल्ली - मराठमोळी नागपूरची मुलगी आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मालविका बनसोडने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ( India Open badminton tournament ) ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालला पराभूत करत ( Malvika Bansod beats Saina Nehwal ) इतिहास रचला आहे. नवी दिल्लीतील के.डी जाधव इनडोअर हॉलमध्ये सायना नेहवालला पराभूत करत मालविकाने स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. मालविकाने सायनाला २१-७ आणि २१-९ अशा दोन सेटमध्ये पराभूत केल्याने नागपुरातील क्रीडा प्रेमींनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
-
🗣 “Dream come true” 😍🥺#MalvikaBansod’s post match reaction👇#YonexSunriseIndiaOpen2022 #IndiaKaregaSmash #Badminton pic.twitter.com/lkXtFhhNmZ
— BAI Media (@BAI_Media) January 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🗣 “Dream come true” 😍🥺#MalvikaBansod’s post match reaction👇#YonexSunriseIndiaOpen2022 #IndiaKaregaSmash #Badminton pic.twitter.com/lkXtFhhNmZ
— BAI Media (@BAI_Media) January 13, 2022🗣 “Dream come true” 😍🥺#MalvikaBansod’s post match reaction👇#YonexSunriseIndiaOpen2022 #IndiaKaregaSmash #Badminton pic.twitter.com/lkXtFhhNmZ
— BAI Media (@BAI_Media) January 13, 2022
ती नेहमी माझी आदर्श आहे - मालविका
सायनाविरुद्ध झालेला सामना हा खूप चांगला होता. यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटली आहे. ती नेहमी माझी आदर्श आहे. हा विजय मला पुढील सामना विजयी होण्यासाठी आत्मविश्वास देईल असे मालविका हिने सांगितले आहे.
पीव्ही सिंधू क्वॉर्टर फाइनलमध्ये -
वीस वर्षीय मालविकाने सायना नेहवाल हिला एकेरी सामन्यात दुसऱ्या फेरीमध्ये 34 मिनीटाच्या खेळात 21-17, 21-9 अशा दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या कार्यकिर्दितील आतापर्यंतची सर्वात मोठा विजय मिळला आहे. याच दरम्यान पीव्ही सिंधू हिने हमवतन इरा शर्मा हिला 30 मिनिटाच्या डावात 21-10, 21-10 अशा दोन सेटमध्ये पराभूत करून क्वॉर्टर फाइनलमध्ये जागा ( pv sindhu in quarter final ) मिळवली आहे.
पुढील सामना आकर्षी कश्यपशी -
मालविका बनसोड हिचा पुढील सामना हा आकर्षी कश्यपशी होणार आहे. आकर्षी हिने हमवतन केयुरा मोपाटिन हिला 21-10, 21-10 पराभूत केले आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मिथुन मंजुनाथने स्पर्धेतून माघार घेतल्याने प्रणॉयला वॉकओव्हर मिळाला आहे.