ETV Bharat / city

Samruddhi Mahamarg Opening : नागपूरसह विदर्भातील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे; 'या' महिन्यात महामार्ग सुरू होण्याची शक्यता - Mumbai Nagpur Samruddhi Expressway

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde on to Start Samruddhi highway ) यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान 525 किलोमीटर अंतरावरील वाहतूक येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेर सुरू करण्याचा विचार असल्याची शक्यता बोलून दाखवली आहे. त्यामुळे केवळ दोन महिन्यांमध्ये समृद्धी महामार्ग सुरू होईल, का या संदर्भात शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातून सुरू झालेल्या समृद्ध महामार्गाच्या कामाची ( Samruddhi Mahamarg work ) प्रगती कशी सुरू आहे, हे पाहण्यासाठी ईटीव्हीच्या प्रतिनिधीने थेट समृद्धी महामार्गाचा दौरा केला.

समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग
author img

By

Published : Dec 11, 2021, 3:20 PM IST

Updated : Dec 11, 2021, 5:08 PM IST

नागपूर - महाराष्ट्राला आर्थिक समृद्धी प्रदान करेल, या हेतूने तयार होत असलेला समृद्धी महामार्ग ( Samruddhi Mahamarg work ) केव्हा पूर्ण होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. नागपूर ते मुंबई ( Mumbai Nagpur Expressway ) दरम्यान तयार होत असलेला 700 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग सुरू करण्याच्या संदर्भात अनेक वेळा डेडलाईन जाहीर ( deadline to complete Mumbai Nagpur Expressway ) करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde on to Start Samruddhi highway ) यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान 525 किलोमीटर अंतरावरील वाहतूक येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेर सुरू करण्याचा विचार असल्याची शक्यता बोलून दाखवली आहे. त्यामुळे केवळ दोन महिन्यांमध्ये समृद्धी महामार्ग सुरू होईल, का या संदर्भात शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातून सुरू झालेल्या समृद्ध महामार्गाच्या कामाची प्रगती कशी सुरू आहे, हे पाहण्यासाठी ईटीव्हीच्या प्रतिनिधीने थेट समृद्धी महामार्गाचा दौरा केला. तेव्हा नागपूर जिल्ह्यातील बहुतांश कामे पूर्णत्वास जात असल्याचे चित्र बघायला मिळाले. केवळ नागपूरच नाही तर फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात विदर्भातील 95 टक्के काम पूर्ण झालेले असेल असा दावा एमएसआरडीचे अधिकारी अनिलकुमार गायकवाड ( MSRD officer Anilkumar Gaikwad ) यांनी केला आहे.

नागपूरसह विदर्भातील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे

हेही वाचा-Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे काम शिर्डीजवळ संथगतीने, सरकारची डेडलाइन तारीख पे तारीख?

नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील शिवमडगा येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होते. तर ठाणे येथे समृद्धी महामार्ग संपतो. शिवमडगा ते ठाणे हे अंतर एकूण 701 किलोमीटर असणार आहे. त्यामुळे सध्याचे 850 किलोमीटरचे अंतर तब्बल 150 किलोमीटरने कमी होणार आहे. समृद्धी महामार्गाचा 701 किलोमीटर पैकी 29 किलोमीटरचा भाग हा नागपूर जिल्ह्यातून जातो. त्यापैकी केवळ 4 किलोमीटरच्या मार्गाचे काँक्रिटीकरण शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाला आहे. येत्या महिन्याभरात नागपूर जिल्ह्यातील काम पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-Samruddhi Mahamarg : पूर्वांचल एक्सप्रेस वेच्या धर्तीवर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग; प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण

समृद्धीची विदर्भातील प्रगती-
विदर्भाच्या विकासाला चालना देणारा समृद्धी महामार्ग विदर्भातील पाच जिल्ह्यांमधून जातो. त्यापैकी नागपूर मध्ये (पॅकेज क्रमांक १) केवळ चार किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. तर वर्धा (पॅकेज क्रमांक २) आणि (पॅकेज क्रमांक ३ आणि ४ ) अमरावती जिल्ह्यातील काम जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. (पॅकेज क्रमांक ६) वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम बरेच मागे पडले आहे. येथे आतापर्यंत केवळ ६० टक्केच काम पूर्ण झालेलं आहे. तर (पॅकेज क्रमांक ७) असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात केवळ पाच किलोमीटरच्या मार्गाचे क्राँक्रिटीकरण होणे बाकी असल्याची माहिती एमएसआरडीचे अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांनी दिली आहे. केवळ वाशीममध्ये रखडलेल्या रस्त्याचा मार्ग वळवावा लागेल, असेदेखील त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा-CM Uddhav Thackeray : कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचे काम अखंड सुरू राहील : मुख्यमंत्री

नागपूर ते शिर्डी वाहतूक फेब्रुवारीमध्ये सुरू करणे शक्य
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान ५२५ किलोमीटर अंतरावरील वाहतूक येत्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेर सुरू करण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनीदेखील हे शक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

रस्ते म्हणजे विकासाचे मार्ग- गडकरी
देशात दर्जेदार रस्ते तयार करण्याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आग्रही भूमिका आहे. दर्जेदार रस्ते असल्यास देश विकासाच्या प्रगतीपथावर सदैव अग्रेसर राहतो. हाच फॉर्म्युला देशातील प्रत्येक राज्यालादेखील लागू होतो. राज्यात रस्त्यांचे जाळे तयार असले तर, राज्यात उद्योग धंद्यांची भरभराट होत असते.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे इंटरचेंजचे काम सुरू-

मुंबई आणि नागपूर (Mumbai to Nagpur) या दोन शहरांना जोडणारा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला 700 किलोमीटरचा 'समृद्धी महामार्ग' (Maharashtra Samruddhi Mahamarg) हा महत्त्वाचा महामार्ग आहे. या प्रकल्पातील शिर्डी-नागपूर (Shirdi to Nagpur) हा महामार्ग पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. या महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे इंटरचेंजचे काम सध्या सुरू आहे. याचबरोबरीने गोदावरी नदीवरील पूल आणि मनमाड - दौंड रेल्वे मार्गावरील पुलही होणे बाकी आहे. सध्या काम धीम्या गतीने सुरू असल्याने येत्या दोन महिन्यात नागपूर-मुंबई टप्पा पूर्ण होऊन वाहतूक सुरू होते की सरकारची घोषणा तारीख पे तारीखच ठरते हे पाहणे मह्त्वाचे असणार आहे.

Last Updated : Dec 11, 2021, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.