ETV Bharat / city

वर्धा आणि गडचिरोली येथील खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

author img

By

Published : Apr 23, 2021, 8:01 PM IST

वर्धा आणि गडचिरोली येथील खासदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही खासदारांनी त्यांना कोरोना परिस्थितीचा आढावा दिला.

नागपूर
नागपूर

नागपूर - विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वर्धा आणि गडचिरोलीचे खासदार अशोक नेते आणी वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांची भेट घेतली. फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

वर्ध्यात जेथे ऑक्सिजन पुरवठ्याचा स्त्रोत आहे, अशा ठिकाणी एक जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार आहे. याशिवाय, रामदास तडस आणि भाजपाच्या वतीने आणखी एक कोविड सेंटर वर्ध्यात निर्माण केले जाणार आहे. त्यासंदर्भात विस्तृत माहिती रामदास तडस यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनीही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना गडचिरोलीतील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर याचा थोडा तुटवडा जाणवतो आहे, असे त्यांनी सांगितले. आपण हा विषयात सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

फडणवीस यांनी कोविड सेंटरला भेटी दिल्या -

सदर येथील आयूष कोविड सेंटर, पाचपावली येथील नागपूर महापालिका, मेडिकल सर्व्हिस सोसायटी आणि जमात-ए-इस्लामीतर्फे चालविल्या जाणार्‍या कोविड सेंटरला देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. तिथे निर्माण होत असलेल्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हॉस्पिटल असोसिएशनचे पदाधिकारी फडणवीस यांच्या भेटीला -

विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. अनुप मरार आणि डॉ. विंकी रूघवानी यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना विदर्भातील रूग्णालयांना तोंड द्याव्या लागत असलेल्या अडचणींची माहिती दिली आणि सहकार्य मागितले. हे सर्व विषय योग्य प्राधिकरणाकडे मांडण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.