ETV Bharat / city

OBC Political Reservation : शिंदे-फडणवीस सरकारचे पितळ उघडे पडले, आता जनताच...; वडेट्टीवारांची राज्य सरकारवर टीका

निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर माजी ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार ( Former OBC Welfare Minister Vijay Wadettiwar ) यांनी भाजपावर आरोपांची सरबत्ती केली आहे. राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने ( Shinde Fadnavis government ) ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण ( OBC Political Reservation ) परत मिळवून दिल्याचा दावा करत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र आज न्यायालयात त्यांचे पितळ उघडे पडले, असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
author img

By

Published : Jul 28, 2022, 7:13 PM IST

Updated : Jul 28, 2022, 7:27 PM IST

नागपूर - जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर माजी ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार ( Former OBC Welfare Minister Vijay Wadettiwar ) यांनी भाजपावर आरोपांची सरबत्ती केली आहे. राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने ( Shinde Fadnavis government ) ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण ( OBC Political Reservation ) परत मिळवून दिल्याचा दावा करत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र आज न्यायालयात त्यांचे पितळ उघडे पडले, असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारच्या मेहनतीचे फलित आहे. भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री यांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिल्याचा डंका पिटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री विजय वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणावर सूनवाई पार पडली : ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली निघण्यापूर्वी जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्या ठिकाणी नगर परिषदांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत, अशा ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टान नकार दिला आहे. त्यामुळे नगरपरिषदा ओबीसी आरक्षणा शिवायच होणार हे आता स्पष्ट झाले आहे. यावर माजी ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'जनताच भाजपाला धडा शिकवणार' : भाजपा नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या वाटेत अडसर ठरलेला आहे. ९३ नगर पंचायतमध्ये ओबीसीला आरक्षण मिळणार नाही, यासाठी भाजपा आणि शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule : स्टंटबाजी करू नका, आता शिंदे-फडणवीसांचे सरकार; चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम

Last Updated : Jul 28, 2022, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.