ETV Bharat / city

Nurses Strike In Nagpur : राज्यस्तरावर परिचारिकांचा बेमुदत संप; आरोग्य व्यवस्था कोलमडली - Indefinite strike of nurses

परिचारिकांचे पद आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याला विरोध करत राज्यस्तरावर परिचारिकानीं बेमुद्दत संप पुकारला ( Nurses Strike In Nagpur ) आहे. त्यामुळे केवळ नागपूर जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णाची रुग्णसेवा विस्कळीत ( health system collapsed ) झाली आहेत.

Nurses Strike In Nagpur
राज्यस्तरावर परिचारिकांचा बेमुदत संप
author img

By

Published : May 30, 2022, 4:49 PM IST

नागपूर - तीन दिवस लोटूनही राज्यसरकार परिचारिकांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने परिचारिका संपावर ( Nurses Strike In Nagpur ) गेल्या आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे. शिवाय रुग्णाचे जीव टांगनीला लागले आहे. परिचारिकांचे पद आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याला विरोध करत राज्यस्तरावर परिचारिकानीं बेमुद्दत संप पुकारला ( Indefinite strike of nurses ) आहे. त्यामुळे केवळ नागपूर जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातील वैदकीय महाविद्यालयातील रुग्णाची रुग्णसेवा विस्कळीत ( health system collapsed ) झाली आहेत. यातच नियोजित शस्त्रक्रिया सुद्धा लांबवाव्या लागल्या आहे. सुमारे 20 हजार परिचारिका संपावर असून संचालक स्तरावर बैठका करून काहीच होणार नसल्याने मंत्रालयीन स्तरावर चर्चा केल्याशिवाय कामावर परत जाणार नाही असा इशारा सुद्धा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले आहे.

प्रतिक्रिया

राज्यातील परिचारिकांचे 23 तारखेपासून आंदोलन सुरू आहे. पण राज्यसरकारने लक्षच दिले नाही. त्यामुळे 28 मे पासून बेमुद्दत संपावर पुकारला होता. यामुळे राज्यभरातील मेडिकल कॉलेजचा परिचारिकानी आंदोलनात सहभाग घेतला. औरंगाबाद येथील मेडिकल कॉलेजच्या सुमारे 800 परिचारिका आणि मुंबईच्या कामा हॉस्पिटलममधील 100 परिचारिका वगळता, 18 मेडिकल कॉलेज आणि सात आरोग्य विभागाच्या परिचरिकांनी संपात सहभाग घेतला आहे. यात आतापर्यंत संचालक स्तरावर चर्चा झाली, पण मागण्या संचालक स्तरावर नसून मंत्रालतयीन स्तरावर आहे. त्यामुळे मंत्रालयात शासकीय स्तरावर बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करत नाही तोपर्यंत तरी आंदोलन मागे होणार नाही. त्यामुळे परिचारिकांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. याचे परिणामही आता दिसून येऊ लागले आहे. रुग्ण व्यवस्था कोलमडली आहे. संप असाच सुरू राहिला तर रुग्णाचे जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील इतर मेडिकल कॉलेजची निर्माण झाली आहे.

नागपूर शहरातील दोन्ही मेडीकल कॉलेजच्या 950 परिचारिका संपावर - नागपूर शहारतील दोन मेडिकल कॉलेज आहे. यात शासकीय मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात दररोज नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णाची संख्या मोठी आहेत. यातच सुमारे 900 पेक्षा अधिक बेडचे हॉस्पिटल असुन लगतच्या राज्यातील रुग्णही उपचार घेण्यासाठी येत असतात. यात 800 मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयाच्या परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. तेच दुसऱ्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजच्या 150 पेक्षा अधिक परीचारिकाही आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळेच दोन्ही मोठया आणि शासकीय रुग्णालयात रुगांना सेवा देण्यासाठी निवासी डॉक्टरांचा ताण वाढला आहे. प्रत्यक्ष सर्वच काम निवासी डॉक्टरांना करावे लागत आहे.

डॉक्टरांच्या मार्डसंघटनेचे परिचारिकाच्या मागण्यांना पाठिंबा - यात परिचारिका संघटनांनी कोरोनाच्या काळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून जीव धोक्यात घालून काम केले. सातत्याने रोटेशन करत कोरोना महामारीचा सामना केला. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समर्थन देत मुख्यमंत्री यांना तसे पत्रही दिले आहे. त्यामुळे परिचरिकांच्या मागण्या योग्य आहेत, त्याकडे शासनाने लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. यात परिचारिकांची भरती करताना आउटसोर्सिंग बंद करावे, केंद्र शासनाप्रमाणे समान वेतन द्यावे, प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात आणि विनंती बदली मान्य करावी, यासह इतरही महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Nurses Strike In Nagpur
राज्यस्तरावर परिचारिकांचा बेमुदत संप

सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न - यावेळी आम्ही नागपूरच्या शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल राजकोंडावर यांनी आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नर्सिंगच्या इंचार्जच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. इमर्जन्सी सर्व शस्त्रक्रिया होत आहे. यात मेडिकल कॉलेजसह राज्यभरातील सर्वच मेडिकल कॉलेजच्या नियीजोत शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत असा आरोप परिचारिका संघटनांनी केला. तसेच अनेक रुगांना तुम्ही रुग्ण घरी घेऊन जाऊ शकता असे म्हणत रुगांना सुट्टी दिली जात असल्याचाही आरोप केला आहे.

हेही वाचा - Nurses Indefinite strike : नागपुरात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे 28 मे पासून कामबंद आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.