ETV Bharat / city

मनसुख हिरेन प्रकरणी 'एटीएस' फाईल करणार 'बी समरी', जाणून घ्या 'बी समरी' म्हणजे काय ?

author img

By

Published : Mar 31, 2021, 2:54 PM IST

Updated : Mar 31, 2021, 3:17 PM IST

अंटिलिया कार स्फोटक प्रकरणात ज्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करण्यात आला होता. ती गाडी मनसुख हिरेन यांची आहे, हे तपासात स्पष्ट झाले आहे. मनसुख हिरेन याने ती गाडी चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. एनआयए अंटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि हिरेन हत्या प्रकरनाचा तपास करत आहे. मात्र मनसुखच्या गाडी चोरी प्रकरणाचा तपास हे एटीएस करत आहे.

ATS will file B summary
ATS will file B summary

मुंबई - अंटिलिया कार स्फोटक प्रकरणात ज्या स्कॉर्पिओ गाडीचा वापर करण्यात आला होता. ती गाडी मनसुख हिरेन यांची आहे, हे तपासात स्पष्ट झाले आहे. मनसुख हिरेन याने ती गाडी चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. एनआयए अंटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि हिरेन हत्या प्रकरनाचा तपास करत आहे. मात्र मनसुखच्या गाडी चोरी प्रकरणाचा तपास हे एटीएस करत आहे.

महाराष्ट्र एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे आणि श्रीपाद काळे यांची टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार मनसुख हिरेन यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात गाडी चोरी झाल्याची खोटी तक्रार दिली होती. एटीएस या प्रकरणात लवकरच बी समरी फाईल करणार आहे.

हे ही वाचा - महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू मराठवाड्यात, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये उच्चांक

एटीएसने या प्रकरणात आपला पूर्ण रिपोर्ट बनवला आहे. या रिपोर्टनुसार सायंकाळी 7 वाजता मनसुख हिरेन आपली स्कॉर्पिओ विक्रोळी येथे उभा करतो आणि ओला कार पकडून रात्री 8:25 वाजण्याच्या सुमारास डीसीपी झोन वन ऑफिसच्या जवळ पोहोचतो. त्यावेळेस सिग्नलवर सचिन वाझे यांची मर्सिडीज गाडी पोहोचते. रात्री 08:26 ला मनसुख त्या गाडीच्या पहिल्या सीटवर जाऊन बसतो. त्यानंतर गाडी सिग्नल क्रॉस करून जीपीओ जवळ उभी राहते. दोघांमध्ये जवळपास नऊ ते दहा मिनिटे मीटिंग होते. मीटिंग संपल्यानंतर 8:35 मिनिटांनी मनसुख मर्सिडीजच्या बाहेर येतो. रस्ता क्रॉस करतो आणि एका टॅक्सीत बसून निघून जातो. त्यानंतर मर्सिडीजही तिथून निघून जाते.

एटीएसच्या तपासानुसार स्कॉर्पिओची चावी मनसुख यांनी वाझे यांना दिली होती आणि ज्या मर्सिडीज गाडीत हे दोघे बसले होते. ती गाडी सुमारे 8:43 मिनिटांनी सीपी ऑफिसमध्ये पोहोचली. त्यानंतर स्कॉर्पिओची चावी वाझे आपल्या एका ड्रायव्हरकडे देतो आणि तो ड्रायव्हर विक्रोळी येथे उभी असलेली गाडी घेऊन वाझे यांच्या साकेत सोसायटीत उभी करतो.

हे ही वाचा - बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

एटीएसच्या अनुसार स्कॉर्पिओ गाडी 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान साकेत सोसायटीत होती आणि पुन्हा 20 फेब्रुवारी ते 24 तारखेपर्यंत तीच स्कॉर्पिओ सीपी ऑफिसच्या कॅम्पसमध्ये उभी होती. त्यानंतर 24 तारखेला ती गाडी स्कॉर्पिओ सीपी ऑफीसमधून निघते आणि प्रियदर्शनी येथे पोहोचते. प्रियदर्शनी येथे एक ईनोवा गाडी उभी असते आणि त्यानंतर या दोन्ही गाड्या अंटालिया जवळ येतात.

बी समरी म्हणजे काय ?
मनसुख प्रकरणात ATS बी समरी फाईल करण्याच्या तयारीत आहे. नेमकी बी समारी म्हणजे काय याची माहिती घेऊया.

जेव्हा तपास यंत्रणांना कळते की, प्रकरणात चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केलाय किंवा आरोपीच्या विरोधात प्रबळ पुरावे नाहीत. अशा प्रकरणात पोलीस स्वतः तक्रारदार बनून चुकीची एफआयआर दाखल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करू शकते.

Last Updated : Mar 31, 2021, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.