नागपूर - मेट्रो रेल्वेच्या मार्गात येणारे शहरातील अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. महापालिकेने त्यासाठी परवानगी दिली असली, तरीही मेट्रोच्या नावावर अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड करण्यात आली. वृक्षतोड मोहीम सुरुच असून आता भरतनगर या भागात नवीन रस्ता बांधण्यासाठीही वृक्षतोड होणार आहे. मात्र तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत महापालिकेने उत्तर सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या मार्गाच्या बांधकामासाठी मात्र तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत महापालिकेने १८ एप्रिल पर्यंतउत्तर सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
या वृक्षतोडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. फुटाळा तलाव येथे खुला मंच बांधण्यात येणार आहे. त्याच्या बांधकामाची जबाबदारी महामेट्रोकडे सोपवण्यात आली आहे. त्यासाठी फुटाळा तलावाकडील रस्ता बंद करण्यात येणार आहे आणि त्याचाच पर्याय म्हणून भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वृक्षतोड न करता रस्ता बांधावा त्यासाठी इतर पर्याय शोधण्यात यावेत, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. या प्रकरणी महापालिकेला १८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत.