नागपूर:- ऐतिहासिक महाराजबाग प्राणि संग्रहालयातील (Maharaj Baug Zoo) प्राण्यांचे थंडीपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने प्राण्यांच्या शेलटर मध्ये हिटर (Heater installed in Zoo) बसवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात बिबट्या,अस्वल आणि पक्ष्यांच्या शेल्टरमध्ये हिटर बसवण्यात आले आहेत. मात्र, पुढील काही दिवसात थंडीचा प्रभाव आणखी वाढणार असल्याने वाघाच्या पिंजऱ्यात आणि इतर प्राण्यांच्या शेलटर मध्ये सुद्धा हिटर बसवण्यात येणार असल्याची माहिती महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे (Maharaj Baug Zoo) क्युरेटर डॉ. सुनील बावसकर यांनी दिली आहे. थंडीच्या काळात प्राण्यांना सर्दी पडसे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
Etv Bharat Special - नागपूरमधील महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हिवाळ्यात लागले हिटर
ऐतिहासिक महाराजबाग प्राणि संग्रहालयातील (Maharaj Baug Zoo in Nagpur) प्राण्यांचे थंडीपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने प्राण्यांच्या शेलटर मध्ये हिटर (Heater installed in Zoo) बसवण्यात आले आहेत.