ETV Bharat / city

आधी फुटबॉल खेळाडू नंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेला अभिनेता बनला मोबाईल चोर - फुटबॉल खेळाडू बनला मोबाईल चोर

नागपूर लोहमार्ग पोलिसांनी चार मोबाईल चोरट्यांच्या टोळीला अटक करून १४ चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशु क्षेत्री नामक फुटबॉलपटू अभिनेत्याचा समावेश आहे.

r
r
author img

By

Published : Jul 5, 2021, 4:37 PM IST

Updated : Jul 5, 2021, 5:17 PM IST

नागपूर - नागपूर लोहमार्ग पोलिसांनी चार मोबाईल चोरट्यांच्या टोळीला अटक करून १४ चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशु क्षेत्री नामक फुटबॉलपटू अभिनेत्याचा समावेश असून त्याने अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड चित्रपटात काम केले असल्याचा खुलासा पोलिसांच्या समोर केला आहे. मौजमज्जा करण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने आरोपींनी मोबाईल चोरीचा मार्ग अवलंबला होता, असा देखील खुलासा केला आहे.

पत्रकारांना माहिती देताना पोलीस निरीक्षक
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश जगदाळे यांनी माहिती दिली की नागपूर रेल्वे स्टेशनच्या आधी आऊटर उभ्या असलेल्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातात असलेला मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात होता. दरम्यान एका प्रियांशु नामक आरोपीला मोबाईल चोरताना रंगेहात अटक करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांच्या चौकशी दरम्यान आणखी दोन साथीदारांचे नाव घेतल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशु क्षेत्री, शुभम जांभुळकर आणि सतेंद्र यादव नामक आरोपींचा समावेश आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या जवळून चोरीचे १४ मोबाईल जप्त केले आहेत.
मौज मज्जा करण्यासाठी करायचे चोरी -
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी ट्रेन मधून मोबाईल चोरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारही आरोपींकडून चोरीचे १४ मोबाईल जप्त केले आहेत. आरोपी हे मोबाईल चोरी केल्यानंतर कमी भावात विकायचे. त्यातून मिळणारे पैसे हे आरोपी मौजमजा करण्याकरिता वापरत असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : Jul 5, 2021, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.