ETV Bharat / city

अखेर तो बिबट्या अंबाझरी उद्यानातील ट्रॅप कॅमेरात कैद - बिबट्या प्रकरण, नागपूर

शुक्रवारी 28 मे रोजी पहिल्यांदा गायत्री नगरात दिसून आलेला बिबट्याचा शहरभर संचार होत होता. गेल्या ९ दिवसांपासुन वन विभाग या बिबट्याच्या शोधात होते. अखेर 6 जूनला तो अंबाझरी गेटच्या फिल्टर् गेटवर 7 वाजून 45 मिनटांला ट्रॅप कॅमेरात दिसून आला आहे.

बिबट्या ट्रॅप कॅमेरात कैद
बिबट्या ट्रॅप कॅमेरात कैद
author img

By

Published : Jun 9, 2021, 10:31 AM IST

नागपूर - नागपूर शहराच्या अनके भागात संचार करून अखेर तो बिबट्या अंबाझरी उद्यान परिसरात पोहोचल्याची माहिती वन विभागकडून देण्यात येत आहे. 6 जूनला तो अंबाझरी गेटच्या फिल्टर् गेटवर 7 वाजून 45 मिनटांला ट्रॅप कॅमेरात दिसून आला. यानंतर वन विभागाकडून या भागात पगमार्क शोधून खात्री केली असताना हा बिबट्या सात दिवसाच्या हुलकावणी नंतर परत अधिवासात पोहचल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.

6 तारखेला ट्रॅप कॅमेरात कैद

शुक्रवारी 28 मे रोजी पहिल्यांदा हा बिबट्या गायत्री नगरात एका घरात दिसून आला. त्यानंतर शहरातील मार्गावर ट्रॅप कॅमेरे लावल्यानंतरही तो दिसून आला नाही. शहरातील अनेक भागात बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. पण कुठेही पगमार्क मिळून आले नाही. अखेर 2 जूनला तो सिव्हिल लाईन परिसरात जातांना एका वाहन चालकाला दिसून आला. त्यानंतर दिसल्याची ठोस माहिती पुढे आली नाही. यामुळे त्यानंतर चार दिवसांनी 6 जूनला सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास अंबाझरी उद्यानाच्या फिल्टर गेटच्या कॅमेरात कैद झाल्याने तो परत अधिवासात परतल्याचे पुढे आले. पण या उद्यानात वन विभागाच्या वतीने 24 कॅमरे आणि तीन पथकांनी गस्त घालून परिसर पिंजून काढला असता, हा बिबट्या 6 तारखेला त्या ट्रॅप कॅमेरात कैद झाला.

मोठी यंत्रणा शोधण्याच्या कामाला

हा बिबट्या शहराच्या मध्यभागी आयटी पार्क, गायत्री नगर, बजाज नगर, महाराज बाग, त्यानंतर सिव्हिल लाईन परिसरात फिरला. माहाराज बागच्या मागील बाजूने वाहणाऱ्या नाल्याच्या भिंतीवर तो महिला मजुराच्या नजरेस पडला. यावेळी त्याचा शोध कसोशिने सुरू झाला. हा बिबट्या पुढे जात असताना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सतत शोध सुरू असताना गस्त घातल्या जात होती. मिळालेल्या महितीची चौकशी केली जात होती. त्याठिकाणी सर्व भाग शोधून काढत त्यावर काम केले जात होते.

खात्रीशीर माहिती मिळाल्यास वन विभागाला सांगण्याचे आवाहन

मागील चार दिवसात शहरात कुठेही बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली नव्हती. अंबाझरी उद्यानात फिल्टर गेटवरील ट्रॅप कॅमेरात दिसून आलेला बिबट्या हा शहरात फिरत असणाराच बिबट्या असल्याची शंका आहे. परंतु, तरीही नागरिकांना काही खात्रीशीर माहिती मिळाल्यास किंवा तसे आढळल्यास वन विभागाला सांगावे, असे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा - नागपुरात जोरदार पावसाची हजेरी; वादळी वाऱ्याने झाडांची पडझड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.