नागपूर - शिवसेनेच्या चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी सत्येविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बहुतांश आमदार आसाम राज्यातील वगुवाहाटी येथे मुक्कामी असल्याने शिवसेने सोबतच महाविकास आघाडीचे भवितव्य देखील संकटात आहे. बंडखोर आमदार शिवसेना नेतृत्वात ओढाताण सुरू असल्यामुळे शिवसेने सोबतचं महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरचं प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नागपुरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी पक्षातील एकही खासदार,आमदार उपस्थित नव्हते.
तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा - दरम्यान, गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमधल्या 42 बंडखोर आमदारांचा ( 42 rebel MLAs from Maharashtra ) फोटो आला समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहेत. यात 35 आमदार शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आमदार दिसत आहेत. ते एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषना देत आहेत. यावर शिवसेनेचे खासदारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाची शिवसेना आहे. प्रसारमाध्यमातून फक्त भाजपाचीच भूमिका मांडली जात आहे. अशी भूमिका ही नितीन देशमुख यांनी मांडली तर महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडावे ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी आपली भूमिका शिवसेना पक्षप्रमुखासमोर आपले म्हणणे मांडावे. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही 24 तासांत मुंबईत दाखल व्हा, असे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आवाहन केले आहे.
हेही वाचा - LIVE : राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, पाहा नेमकी काय आहे परिस्थिती?
हेही वाचा - Ashadhi Wari 2022 : जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी; पाहा, पालखी सोहळ्यातील खास छायाचित्र