नागपूर : धनगर समाजाला सोईसुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारस करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण
( Reservation for Dhangar Community ) देण्याची शिफारस करावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे ( MP Dr. Vikas Mahatme ) यांनी केली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Social Justice Minister Dhananjay Munde ) यांनी धनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारला शिफारस करणार आहे. त्यानंतर कोण आरक्षणविरोधी आहे हे लवकर समोर येईल, असे विधान केले होते. या विधानाला प्रत्युत्तर देताना डाॅक्टर बोलत होते.
शिफारस करताना स्पष्टता असावी : यावेळी बोलताना धनगर समाजाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी त्यांना तीन वर्षांत फडणवीस सरकारने लागू केलेल्या शासन निर्णयाचे काय झाले? असा सवाल उपस्थित केला. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी धनगरांच्या आरक्षणासाठी नक्कीच शिफारस करावी. पण, 1979 मध्ये शिफारस करण्यात आली. पण, त्यानंतर ती 1981 मध्ये मागे घेण्यात आली. त्यामुळे तसे पुन्हा होऊ नये, असा टोला लगावला. तसेच शिफारस करताना एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे, असेही शिफारस करताना स्पष्ट करा, असेही महात्मे म्हणालेत. ती शिफारस "नरो वा कुंजरो वा"सारखी भ्रमित करणारी नसावी, असेही धनगर समाजाचे नेते तथा माजी खासदार विकास महात्मे म्हणालेत.
फडणवीस सरकारने एसटीप्रमाणे सवलती दिल्या : देवेंद्र फडणवीस सरकार केवळ बोलेले नाही, तर करूनही दाखवले. एसटी प्रवर्गातून आरक्षण देता येत नाही. पण, एसटीप्रमाणे सवलती देण्यासाठी वर्षाला 1 हजार कोटी रुपये देऊन 13 शासन निर्णय काढले. पण, सरकार बदलताच महाविकास आघाडी सरकारने एकही रुपया दिला नसल्याचा आरोप खासदार महात्मे यांनी केला.
शिवसेनेने आश्वासन देऊन पाळले नाही : राज्यभरात अनेक जिल्ह्यांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्यात आले. पण, अनेक भवनांचे काम अर्धवट राहिले. त्याकडेही लक्ष देण्याची मागणी केली. शिवसेने धनगरांना एसटीचे आरक्षण देऊ, असे म्हणूनसुद्धा अजून दिले नाही. त्यामुळे धनगर आरक्षण विरोधी कोण आहे हेच कळते असल्याचे म्हणाले. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाचे प्रश्न निकाली काढून निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी खासदार तथा धनगर समाजाचे नेते विकास महात्मे यांनी केली.
हेही वाचा : ...अन्यथा आषाढीवारीला मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला येऊ देणार नाही - धनगर आरक्षण कृती समिती