ETV Bharat / city

Nana Patole Critisized BJP : सतीश उके प्रकरणानंतर फडणवीस-पटोलेंचा एकत्र विमानप्रवास, नाना पटोले म्हणाले... - नाना पटोले भाजपावर टीका

वकील सतीश उकेंवर ईडीच्या कारवाईनंतर ( Satish Uke Arrest ED ) आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Devendra Fadnavis And Nana Patole In Same Flight ) यांनी आज एकाच विमानातून मुंबई ते नागपूर पर्यंतचा प्रवास केला. त्यामुळे राज्यात ईडीच्या कारवाईवरून भाजपा आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू असताना आणि नुकताच सतीश उकेंवरील ईडीच्या करवाईनंतर फडणवीस आणि पटोले यांचा एकत्र विमान प्रवास केवळ योगायोग आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Nana Patole Critisized BJP
Nana Patole Critisized BJP
author img

By

Published : Apr 1, 2022, 3:58 PM IST

Updated : Apr 1, 2022, 4:27 PM IST

नागपूर - वकील सतीश उकेंवर ईडीच्या कारवाईनंतर ( Satish Uke Arrest ED ) आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Devendra Fadnavis And Nana Patole In Same Flight ) यांनी आज एकाच विमानातून मुंबई ते नागपूर पर्यंतचा प्रवास केला. यावर नाना पटोलेंना विचारले ( Nana Patole Statement On Journey With Devendra Fadnavis ) असता, 'देवेंद्र फडणवीस हे कायम माझे मित्र आहेत. राजकीय विरोध असू शकतो. पण मनभेद नाही, त्यामुळे पत्रकारांनी याला वेगळ्या दिशेने नेऊ नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, राज्यात ईडीच्या कारवाईवरून भाजपा आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरू असताना आणि नुकताच सतीश उकेंवरील ईडीच्या करवाईनंतर फडणवीस आणि पटोले यांचा एकत्र विमान प्रवास केवळ योगायोग आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

सतीश उके प्रकरणावरून भाजपावर टीका - गेल्या काही काळात राज्यात काँग्रेसचा वाढता प्रभाव दिसून आल्यानंतर ही भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. मला बदनाम करण्यासाठी माझे वकील सतीश उकेंवर ईडीची कारवाई झालेली आहे. मात्र, भाजपचे मनसुबे कधी यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. तसेच 'सतीश उके हे माझे वकील आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात आणि रश्मी शुक्ला मानहानी प्रकरणात ते माझे वकील आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. मुंबई ईडीची टीम नागपूरला येऊन कारवाई करते आणि नागपूरच्या कार्यालयाला त्याची साधी कल्पना देखील देण्यात येत नाही. याचाच अर्थ असा होतो की, केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून मोठ षड्यंत्र रचलं जात असल्याचेही पटोले म्हणाले.

'ईडीला चिल्लर केलं जातं आहे' - मुळात ईडीची स्थापना कश्यासाठी करण्यात आली होती. त्याचा मूळ उद्देश काय होता, याचा विसर केंद्र आणि भाजप नेत्यांना पडलेला आहे. आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक भ्रष्ट्राचार तपासण्यासाठी ईडीची निर्मिती झाली होती. मात्र, केंद्र सत्तेचा गैरवापर ईडीच्या रूपाने धमकावण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी करत आहे. एका प्रकारे भाजपचे ईडीला चिल्लर केले असल्याने आता सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुमोटो याचिका दाखल, करावी अशी विनंती नाना पटोले यांनी केली आहे.

कोणताही आमदार नाराज नाही - काँग्रेसचे आमदार पक्षश्रेष्ठींनी भेटण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यात गैर असं काहीचं नाही. आमदार कुणातीही तक्रार किंवा नाराजी व्यक्त करण्यासाठी जात नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा - Chief Minister's Explanation : माझा माझ्या सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास - मुख्यमंत्री

Last Updated : Apr 1, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.