ETV Bharat / city

International Water Day : नागपूरमध्ये जल दिनानिमित्त 'जल रेसिपी' स्पर्धा - Vishnuji ki rasoi

नागपूरमध्ये जागतिक जल दिनानिमित्त ( International Water Day ) 'जल रेसिपी' (Jal Recipe) ही खास स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांना कमीत कमी पाण्याचा वापर करून एक खाद्यपदार्थ बनवायचा होता. याचे जज 'विष्णुजी की रसोई'चे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे होते.

International Water Day
International Water Day
author img

By

Published : Mar 23, 2022, 7:57 PM IST

नागपूर - आपण खाद्य पदार्थ बनवण्याच्या अनेक स्पर्धा पहिल्या असतील. पण नागपूरात कमीत कमी पाण्याचा उपयोग करून स्वादिष्ट व्यजंन तयार करण्याची आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा 'विष्णुजी की रसोई' येथे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या निरीक्षणात घेण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य हेतू होता जागतिक जल दिनानिमित्त स्वयंपाक घरात पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचा संदेश देण्यासाठी. त्यासाठीच 'जल रेसिपी' ही खास स्पर्धा घेण्यात आली. यात गृहिणींना रोज सहज स्वयंपाक घरात जेवण बनवण्याचा अनुभव असला तरी या स्पर्धेत खाद्यपदार्थ बनवताना काय आव्हान आले जाणून घेऊ या विशेष रिपोर्ट मधून...

'जल रेसिपी' स्पर्धा
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ इतका भयानक असतो की, कळशीभर पाण्यासाठी मैलभर अंतर कापून तासभर बसून वाट्याने पाणी भरणारे दुर्भिक्ष चित्र अनेक भागात आजही पाहायला मिळते. त्यामुळे महिलांना पाण्याचा वापर करताना काटकसर असतेच पण हाच संदेश घरोघरी पोहचावा या उद्देशाने विदर्भ पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, आणि भारतीय जलसंसाधन संस्थेच्या वतीने ही स्पर्धा घेत व्यापक जनजगृती करण्यात आली.
International Water Day
विष्णू मनोहरची उपस्थिती
नागपुरात झालेली स्पर्धा होती तरी कशी
यामध्ये विविध क्षेत्रातील महिलांचे प्रत्येकी पाच महिलांच एक गट अशा पद्धतीने 10 गटात 50 महिलांचा सहभाग करून ही स्पर्धा घेण्यात आली. यात कमीत कमी पाण्याच्या उपयोग करून खाद्यपदार्थ करायचे होते. चवीला चवदार आणि दिसायला आकर्षक सजावट करून सादरीकरण करायचे होते. यात प्रत्येक गटाला पदार्थ बनवण्यासाठी दोन लिटर पाणी देण्यात आले होते. सर्वाना भाजी धुण्यासाठी एकाच मोठ्या पातेल्यात पाणी देण्यात आले. यात भाजी देतांना जरी डिश बनवण्याचा निर्णय त्या त्या गटाला घ्यायचा होता. पण यात भाजीपाला किंवा फळ देतांना रसाळ फळभाज्या देण्यात आल्यात. जेणेकरून फळ भाज्यांमध्ये असलेल्या पाण्याचा उपयोग खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

हेही वाचा - Nashik : रंगपंचमीत डिजे, लाऊडस्पीकरचा आवाज केल्याने 5 मंडळांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

महिलांनाच नाही तर घरातील प्रत्येक सदस्याला संदेश
यात स्वयंपाक गृहात अनेक छोट्या छोट्या बाबी असतात ज्याचे पालन केल्यास मोठा फायदा पाणी बचतीसाठी होऊ शकतो असेही सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले. या स्पर्धेतून महिलांमध्ये जलजागृती करून यातूनच घरातील प्रत्येक सदस्याला पाण्याचे महत्व पटवून दिल्यास व्यापक स्वरूपात जनजागृती होऊ शकेल. यामुळे जल रेसिपी स्पर्धेतून जल जागृती करण्याचे ठरवल्याचे जल अभ्यासक महाराष्ट्र जल भूषण पुरस्कार प्राप्त प्रवीण महाजन यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले. यावर उदाहरण देताना म्हणाले की चार लोकांसाठी खिचडी बनवतांना कितीतरी पाणी तांदूळ धुण्यासाठी लागते. पण योग्य नियोजन केल्यास पाण्याचा अपव्यय टाळला जाऊ शकतो असेही महाजन म्हणालेत.
International Water Day
पाच महिलांनी बनवले पदार्थ
यात सहभागी कोणी घेतला
ही स्पर्धा खास ठरण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे यात 10 क्षेत्रातील म्हणजेच वकील, डॉक्टर, राजकीय, लेखक कवी, इंजिनियर, शिक्षिका, जेष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कलावंत, गृहिणी यांना हे पदार्थ बनवायचे होते. यात विशेष म्हणजे पूर्वी फार काही ओळख नसतांना काही क्षणात उपलब्ध भाज्यांच्या माध्माँयमातून कुठला पदार्थ तयार करायचा याचा निर्णय घ्यायचा होता. यात एकापेक्षा अधिक डिश तयार करायच्या होत्या. प्रत्येकाना एक तास देण्यात आला. पाच महिलांनी मिळून नवीन डिश बनवल्या आहे. यात सजावट केल्यानंतर सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर त्याची चव चाखून गुणांकन दिले. पण पहिल्यांदाच अश्या पद्धतीने खाण्याचे पदार्थ बनवणाला जलजागृतीशी जोडण्यात आले. त्यामुळे पदार्थ खास ठरलेच आणि स्पर्धा ही तेवढीच खास ठरली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.