नागपुर - एकीकडे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध जनप्रतिनिधी, असा संघर्ष सुरू असताना पालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी आयुक्त मुंढेंच्या समर्थनात काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. या समर्थकांनी 'मुंढे तुम आगे बढो' ची नारेबाजी केली, तसेच मुंढेची प्रतिमा असलेले मास्क परिधान करुन त्यांना पाठिंबा दिला.
हेही वाचा... काहीच नाही झालं.. मग 20 सैनिक मारले कसे, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधानांना सवाल
काँग्रेस नगरसेवक कमलेश चौधरी यांनी हातात बॅनर घेऊन सुरेश भट सभागृहाबाहेर मुंढेंच्या समर्थनात घोषणाबाजी केली. मुंढेच्या विरोधात महापालिका सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक पवित्र्यात असताना काँग्रेस नगरसेवक कमलेश चौधरी काँग्रेस मुंढे यांच्या समर्थानात पुढे आले आहेत. यावेळी त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो असलेले मास्क घालून प्रदर्शन केले. तर दुसरीकडे तब्बल तीन महिन्यानंतर आयोजित करण्यात आलेली नागपूर महानगरपालिकेची सभा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सभात्यागामुळे चांगलीच गाजली आहे.
नागपूर महापालिकेच्या सभागृहात मुंढे समर्थक आणि विरोधक, असे दोन गट आमने सामने आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हा संघर्ष पुन्हा तीव्र होईल. या सर्व घटनाक्रमात पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपुरातील नागरिकांचे मोठे समर्थन देखील मिळत आहे.