ETV Bharat / city

किळसवाने..! विकृताने केले सहा मुलांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल - संतापजनक

एका विकृताने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका मुलाला त्रास होत होता, त्याच्या वेदना वाढत असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्याची विचारपूस केली असता हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

पोलीस ठाणे सीताबर्डी
पोलीस ठाणे सीताबर्डी
author img

By

Published : Jun 1, 2022, 5:51 PM IST

नागपूर - तीन दिवसांपूर्वीच नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आरोपींनी एका तरुणाचे लैंगिक शोषण केल्याची किळसवानी घटना होती. ही घटना ताजी असताना एका विकृत आरोपीने सहा लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका मुलाला त्रास होत होता, त्याच्या वेदना वाढत असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्याची विचारपूस केली असता हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

माहिती देतान पोलीस निरीक्षक

मयूर खोडके, असे आरोपीचे नाव आहे. लहान मुलांना आंबे आणि चिंच देण्याचे आमीष दाखवून तो त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी मयूर हा पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मयूर खोडके हा धरमपेठ भागातील झोपडपट्टीमध्ये राहतो. सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने आरोपी मयूर झोपडपट्टीत राहणाऱ्या लहान मुले आंबे आणि चिंच तोडण्यासाठी महाराजबाग परिसरातील झुडपात घेऊन जात होता. आरोपी लहान मुलांना आंबे, चिंच देण्याचे आमिष दाखवून एका पडक्या घरात नेऊन त्यांच्या सोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. दोन ते तीन महिन्यांपासून आरोपी अशा प्रकारचे कृत्य करत होता. मात्र, भीतीपोटी कोणत्याही मुलाने घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. तीन दिवसांपूर्वीही त्याने एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याचे लैंगिक शोषण केले. त्या मुलाला त्रास होऊ लागला होता. त्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या तब्येतीची चौकशी केली तेव्हा या प्रकारची माहिती त्यांना समजली. त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

तक्रार दाखल होताच आरोपी पसार - पीडित मुलाच्या वडिलांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात आरोपी मयुर खोडके याच्या विरुद्ध तक्रार दिली. तक्रार दाखल होताच मयुर हा पसार झालेला आहे. सीताबर्डी पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी दोन पथके रवाना केली असून लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली आहे.

हेही वाचा - Police Action On Thief : ओडीसातील सराईत चोरट्याच्या नागपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 951 ग्राम सोन्याचे दागिने जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.