नागपूर - मनपाच्या कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्त्याचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपात कार्यालयीन कामानिमित्त्त गेले असताना एका शिवसैनिकाने हे दृष्य कॅमेरात कैद केले आहे. यामुळे कार्यालयीन वेळेत कर्मचारी सामान्य जनतेचे काम करण्याऐवजी पत्त्यांचे गेम खेळतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शिस्त लावण्यासाठी मनपा प्रशासन काय कारवाई करेल याकडेही लक्ष लागले आहे.
नागपूर मनपाच्या कार्यलयातील सामान्य प्रशासन विभागात एका संगणकावर हा पत्त्यांचा गेम सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावेळी या संगणकासमोर खुर्चीवर असलेला कर्मचारी नसून कदाचीत खेळता खेळता दुसरं काही कामानिमित्त उठून गेले असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचे दिसून येते. तेच बाजूला महिला कर्मचारी काम करतांना दिसून येत आहे. यामुळे ह टेबल नेमका कोणाचा आहे हे मनपा प्रशासनाला माहीत करणे काही कठीण नाही. पण कार्यलयात कार्यालयीन कामकाज सोडून पत्त्याचा काम केले जात आहे. हा प्रश्न व्हिडीओ काढणाऱ्या नितीन सोळंके या शिवसैनिकाने उपस्थित केला आहे.
एकीकडे सामान्य जनता आपले काम करून घेण्यासाठी मनपाच्या इमारती चकरा मारत चपला झिझवत असतात. दुसरीकडे कामाचा पगार घेऊन काही कर्मचारी अश्या पद्धतीने कामाच्या वेळेत संगणकावर पत्ते खेळत आहे. यामुळे हा प्रकार नक्कीच गंभीर आहे. शिवाय चांगले काम करणारे अनेक कर्मचारी या अश्या पद्धतीने वागणार्या प्रवृत्तीमुळे बदनाम होत असल्याचे सुद्धा नजरेस पडत आहे. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन तर अश्या कामचुकार पणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.