नागपूर - दुसऱ्यांवर करवाई झाली तर सत्यमेव जयते आणि स्वतःवर करवाई झाली की, असत्यमेव जयते. हा दुटप्पीपणा आहे, अशा शब्दा समनातून केलेल्या टीकेला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar comment over sanjay raut ) यांनी प्रत्युत्तर दिले. ते नागपुरात लोकमान्य टिळक चौकातील भाजपच्या जुन्या कार्यालय परिसरात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते चंद्रशेखर बांवनकुळेही उपस्थिती होते. भाजपकडून स्थापना दिवसानिमित्त पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.
इडीच्या कारवाईवरून सामनातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. यावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य आहे. मात्र, काही लोकांचा मूळ स्वभाव झाला आहे. जेव्हा स्वतःची चूक होते तेव्हा स्वतः त्या चुकीच्या समर्थनात न्यायाधीश होतात. दुसऱ्याचे चुकते तेव्हा त्याच्या विरुद्ध न्यायाधीश होतात. या राज्यात विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना सीआरपीसीमध्ये नोटीस दिली जाते, 138 कोटींच्या भारत देशामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस जाते, प्रवीण दरेकरांना नोटीस देली तेव्हा सत्यमेव जयते आणि आपल्यावर वेळ आली की मग असत्यमेव जयते हा दुप्पट दुटप्पीपणा आहे, असे ते म्हणाले. मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झालेल्या आहेत. संपादक म्हणून महाराष्ट्रापुढचे प्रश्न गौण झाले आणि स्वतःचे प्रश्न मांडत असल्याची टीका संजय राऊत यांच्या सामन्यातील लेखवर त्यांनी केली.
महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ गेल्याने विदर्भ, मराठवाड्यातील नोकरीचे संरक्षण गेले. सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही. महाभारतातील शिशुपालाचे 100 अपराध त्याच पद्धतीने या सरकारचे 100 समस्या सांगता येईल. या ठिकाणी जनता श्रेष्ठ नाही, तर आम्ही श्रेष्ठ आहोत, असा आविर्भाव दाखवण्यात येत आहे, हे चुकीचे आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
श्रमातून तयार केलेल्या संपत्तीवर कारवाई केली असे शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काही वर्षांनी का होईना साक्षात्कार झाला. हेच वाक्य कंगना राणावत म्हणत होती, जेव्हा कंगना रणावतचे घर बुलडोजर घेऊन तोडायला निघाले होते. काही चुका असल्या तरी मेहनत करून बांधले. कमीत कमी या घटनेनंतर कंगना रणावत आणि संजय राऊत यांच्या विचारात समानता आली, हे मोठे यश मानले पाहिजे.
महा विकास आघाडीमध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना वाटते गृहमंत्री सुडाच्या भावनेने वागत आहे. गृहमंत्री कारवाई करत नाही म्हणून नाराज आहे. या राज्यामध्ये अनेक मंत्री आहे ज्यांना वाटते की, जितक्या वेगाने पैसे खाता येईल तितक्या वेगाने पैसे खाता येत नाही, सेनेचे नेते अमादर खासदार मुख्य सचिव यांच्या विरुद्ध तक्रार करायला गेले होते. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपले दुःख आणि वेदना व्यक्त केलेल्या आहेत. त्यामध्ये गीते, खासदार बंडू जाधव असतील, तानाजी सावंत अशी मोठी यादी आहे. शिवसेना, असो की राष्ट्रवादी असो की, काँग्रेस, हे नाराज आहे. यांच्या नाराजीचा काही सोयरसुतक नाही. यांची नाराजी या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात दूर झाली नाही तरी काही फरक पडणार नाही.