ETV Bharat / city

Azadi Ka Amrit Mahotsav : धावत्या मेट्रोत 75 विद्यार्थिनींनी 75 मिनिटांत 75 चित्र रेखाटून भरले स्वातंत्र्य उत्सवाचे रंग - आझादी का अमृत महोत्सव

नागपुरच्या 75 विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत 75 मिनिटे 75 चित्र रेखाटून ( student drew colors of freedom in a running metro ) त्यात स्वातंत्र्यउत्सवाचे रंग भरले आहेत. विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये भरलेले रंग म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग, बलिदान आणि समर्पण दर्शवतो.

Azadi Ka Amrit Mahotsav
Azadi Ka Amrit Mahotsav
author img

By

Published : Aug 5, 2022, 3:49 PM IST

Updated : Aug 5, 2022, 4:21 PM IST

नागपूर - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आगळ्या ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नागपुरच्या 75 विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत 75 मिनिटे 75 चित्र रेखाटून ( student drew colors of freedom in a running metro ) त्यात स्वातंत्र्यउत्सवाचे रंग भरले आहेत. विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये भरलेले रंग म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग, बलिदान आणि समर्पण दर्शवतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या वीर योध्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी स्वतःचे जीवन समर्पित केले अशा सर्व शूर वीरांना या विद्यार्थिनींनी चित्र आणि रंगाच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

धावत्या मेट्रोमध्ये चित्र रेखाटून त्यात स्वातंत्र्याचे रंग भरून या वेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया ही संकल्पना शाळेच्या शिक्षकांनी आर्टच्या विद्यार्थिनी समोर मांडली. त्यावेळी विद्यार्थिनींना उत्साह बघण्यासारखा होता. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवा निमित्त साजरा होत असलेल्या उत्सवात भाग घेण्याची मोठी संधी मिळाल्यामुळे मन गौरवीत झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे.

सेंट उर्सुला गर्ल्स शाळेच्या विद्यार्थिनी : धावत्या मेट्रोमध्ये सलग 75 मिनिटे 75 चित्र रेखाटनाऱ्या या 75 विद्यार्थिनी नागपूरच्या सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. 75 विद्यार्थिनींनी फ्लूट आर्ट ऍक्टिव्हिटी आणि फेब्रिक पेंटींगच्या माध्यमातून कॅनवसवर स्वातंत्र्य लढच्या गौरवशाली इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

'रेकॉडची नोंद करण्याचा प्रयत्न' : धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये एकाच वेळी 75 विद्यार्थिनींनी 75 मिनिटे 75 चित्र रेखाटण्याचा उपक्रम यापूर्वी भारतात कुठेही झालेला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त या उपक्रमाची नोंद केली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली जावी, अशी इच्छा सेंड उर्सुला शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Azadi Ka Amrit Mahotsav : एकतेचे वस्त्र विणण्याचा उपक्रम पूर्ण; आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Last Updated : Aug 5, 2022, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.