ETV Bharat / city

'ईटीव्ही भारत'चा बातमीनंतर भाजप मैदानात; रिक्षा चालकाला न्याय देण्यासाठी अंधेरी आरटीओ समोर होणार आंदोलन - रमेश साहू रिक्षा अंधेरी आरटीओ

'ईटीव्ही भारत'ने 'अंधेरी आरटीओ रिक्षा परवाना घोटाळा; चोराला सोडून संन्याशाला फाशी' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आता भाजप टॅक्सी रिक्षा सेलने या प्रकरणाची दखल घेतली असून, साहू यांना न्याय मिळून देण्यासाठी मंगळवारी अंधेरी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ramesh sahu license case andheri rto
रमेश साहू रिक्षा अंधेरी आरटीओ
author img

By

Published : Mar 19, 2022, 10:51 AM IST

मुंबई - रिक्षा चालक रमेश साहू यांचा लायसन्स आणि बॅच बिल्ल्याचा गैरवापर करून एका अनोळखी इसमाने नवीन रिक्षा नोंदणी केली. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी अंधेरी आरटीओकडे तक्रार केली असता, साहू यांची रिक्षा आरटीओने जप्त केली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने 'अंधेरी आरटीओ रिक्षा परवाना घोटाळा; चोराला सोडून संन्याशाला फाशी' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आता भाजप टॅक्सी रिक्षा सेलने या प्रकरणाची दखल घेतली असून, साहू यांना न्याय मिळून देण्यासाठी मंगळवारी अंधेरी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया देताना भाजप टॅक्सी रिक्षा सेलचे अध्यक्ष के.के तिवारी

हेही वाचा - Holi Of Artists : बॉलीवूडने घेतला एनसीबीचा धसका ? सर्व कलाकारांची होळी घरीच साजरी

परवाना घोटाळ्याची चौकशी करा -

भाजप टॅक्सी रिक्षा सेलचे अध्यक्ष के.के तिवारी यांनी सांगितले की, रिक्षाचालक रमेश साहू यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. अंधेरी आरटीओ रमेश साहू प्रकरणात आपली चूक मान्य करण्यास नकार देत आहे. त्यामुळे, आम्ही अंधेरी आरटीओ, परीवहन आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 22 मार्च 2022 पर्यंत रिक्षा चालक रमेश साहू यांच्या लायसन्सचे लबाडीने गैरवापर करून अनोळखी इसमाने केलेल्या फसवणुकीची तात्काळ चौकशी करून, रमेश साहू यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. जर साहू यांना 22 मार्च 2022 पर्यंत न्याय मिळाला नाही, तर अंधेरी आरटीओ कार्यालयासमोर रमेश साहूबरोबर आम्ही आंदोलन करू, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

रमेश साहू यांनी याबाबत जेव्हा आरटीओकडे तक्रार केली. तेव्हा दोन्ही रिक्षा आरटीओमध्ये जमा करण्यात आले होते. तेव्हा आरटीओने या दोन्ही रिक्षांची चौकशी करून दोषी रिक्षा चालकावर तात्काळ नियमानुसार कलम 420 आणि 467 अंतर्गत गुन्हा नोंदविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे, आरटीओ अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याची शंका आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

अंधेरी आरटीओने उत्तर द्यावेत -

रिक्षा चालक रमेश साहू यांच्या लायसन्सवर फोटो कशी बदलली गेली? एकाच लायसन्स आणि बॅचवर दोन रिक्षांची नोंदणी कशी झाली? जेव्हा रमेश साहू यांनी आरटीओमध्ये रिक्षा जमा केली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आरटीओने बोगस रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा का दाखल केला नाही? या सर्वांचे प्रश्न आरटीओने आम्हाला द्यावे, अशी मागणी के.के तिवारी यांनी केली आहे. रिक्षा चालक रमेश साहूला कोरोना काळात ज्या आरटीओ अधिकाऱ्यांनी बेरोजगार केले त्या सर्व आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी व्हावी. रमेश साहू यांच्या रिक्षाचे संपूर्ण नुकसना भरपाई द्यावीत, अशी मागणी तिवारी यांनी केली.

आरटीओ अधिकार्‍यांची चौकशी करा -

आज आरटीओ कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यांचा फटका रमेश साहूसारख्या गोरगरीब रिक्षाचालकाला बसत आहे. तक्रार करून सुद्धा तक्रारदाराचे आरटीओ कार्यालयात ऐकले जात नाही. त्यामुळे, परीवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणात लक्ष घालून रमेश साहूला न्याय द्यावा. याशिवाय संपूर्ण आरटीओ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी. कारण, आरटीओच्या कारभारामुळे अनेक बोगस रिक्षा रस्त्यांवर धावत असल्याची शंका सुद्धा तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Shab-E-Barat : मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान येथे शब-ए-बारात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.