नागपूर - शहराससह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्री पासून पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने ४.३० च्या सुमारास पुन्हा जोर पकडला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी पुनरागमन केले. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि मध्यरात्रीपासून पुन्हा पाऊस बरसायला लागला.
दडी मारलेल्या पावसामुळे पीक करपण्याच्या मार्गावार होती. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात १७०.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे.
सध्या सुरू असलेला पाऊस पश्चिम बंगाल परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आहे. अशी माहिती हवामान विभागाणे दिली आहे. सोयबिन आणि कापूसाची पेरणी झाल्याने बळीराजा पाऊसाच्या प्रतीक्षेत होता. पाऊस नसल्याने भात पीक शेतकरी चिंतेत होता. मात्र, पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी तूर्तास सुखवला आहे.