नागपूर - नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरात कंपाऊंडच्या भीतीला लागून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 9 मार्चला 6 भ्रूण मिळून आल्याने चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. पोलीस तपासात हे भ्रूण त्याच परिसरात बंद पडलेल्या पुरोहित नर्सिंगहोममधील असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काचेच्या भरणीत संरक्षित ठेवण्यात आलेले भ्रूण असल्याचे नर्सिंगहोमकडून सांगण्यात आले आहे. याच बंद पडलेल्या नर्सिंग होमचे साहित्य केयरटेकरने भंगारात विकले. यातच हे भ्रूण फेकण्यात आल्याचे तपासातील सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे.
सीसीटीव्हीत भ्रूण कचऱ्याचे ढिगाऱ्यात फेकल्याचे आले समोर
क्वेटा कॉलनी परिसरात पुरोहित नर्सिंग होम आहे. हे नर्सिंगहोम डॉ. यशोदा पुरोहित या स्त्रीरोग तज्ज्ञ यांचे होते. तसेच त्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सुद्धा कार्यकरत होत्या. पण त्यांचे 2016 मध्ये निधन झाल्यानंतर हे नर्सिंगहोम बंद पडले आहे. या नर्सिंगहोममधील असलेल्या भंगार साहित्याची येथील केयर टेकरने मालकाला न सांगताच विकले. यातच हे भ्रूण जे काचेच्या भरण्यात होते, ते सुद्धा त्या भंगारवाल्याला देण्यात आले. यात हे साहित्य भंगारवाल्याने एका पिशवीत टाकून त्या कंपाऊंड जवळ टाकून निघाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले.
सर्वच बाजूने पोलिसांचा तपास सुरू, अद्याप गुन्हा दाखल नाही
लकडगंज पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत भंगारवाल्याला शोधले असतांना त्या भंगारवाल्याकडून पुरोहित नर्सिंगहोमची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी नर्सिंग होममध्ये जाऊनही चौकशी केली. यात हे भ्रूण 2016 पूर्वी असल्याचे सांगण्यात आले. पण असे असले तरी पोलिसांनी सर्वच बाजूने विचार करत तपास सुरू केला आहे. यात हे भ्रूण किती वर्षे जून आहे, हे जाणून घेण्यासाठी उत्तरीय तपासणीसाठी भ्रूण लॅबमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. तसेच यात नर्सिंगहोमने हे भ्रूण वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ठेवले असले तरी नियमानुसार ते ठेवता येते का? याचाही तपास केला जाईल. यासोबतच हे भ्रूण किंवा मेडिकल वेस्टची व्हिलेवाट लावताना नियमांचे उल्लंघन झाले. यासाठी महानगर पालिकेकडून माहिती पोलिसांनी मागवली आहे. या प्रकरणात अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नसला तरी सर्व तपासणी अहवालानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.
आर्वीचे अवैध गर्भपात प्रकरण ताजे असताना
जानेवारी महिन्यात वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात सुद्धा अशाच पद्धतीने कदम नर्सिंगहोममध्ये बायोमेडिकल वेस्ट गोबर गॅसच्या प्लॅन्टमध्ये नष्ट करण्यात आले होते. यामध्ये अवैध गर्भपातच्या घटनेनंतर त्या खड्यात व्हिलेवाट लावत असल्याचा धक्कादायक प्रकाराने महाराष्ट्रभर खळबळ उडाली होती. या ठिकाणी 12 कवट्या आणि 56 हाडे मिळून आल्याचे प्रकरण ताजे असतांना या घटनेत पोलीस तपासात पुढे काय येते याकडे लक्ष लागले आहे. तसेच यात क्वेटा कॉलनी परिसरात बायोमेडिकल वेस्ट व्हिलेवाट लावण्याचे उल्लंनघन झाल्याचे समोर येत आहे हे नक्की.
हेही वाचा - Embryo Found In Nagpur : नागपुरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात भ्रूण आढळून आल्याने खळबळ..