ETV Bharat / city

Young MLA Meet Sharad Pawar : महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट - तरुण आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

महाविकास आघाडी सरकारमधील तरुण आमदारांनी शरद पवार यांची त्यांच्या राहत्या घरी सिल्वर ओक येथे जावून भेट घेतली. यावेळी पवारांनी या आमदारांना राजकीय सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. आमदार रोहित पवार, राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार योगेश कदम, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, आमदार आशुतोष काळे, आमदार अतुल बनके, आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी एकाच वेळी भेट घेतली.

शरद पवार आणि युवा आमदार
शरद पवार आणि युवा आमदार
author img

By

Published : Mar 17, 2022, 6:40 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील तरुण आमदारांनी आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या राहत्या घरी सिल्वर ओक येथे भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्याकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर महाविकास आघाडी सरकारमधील या तरुण आमदार आणि मंत्र्यांनी सल्ला घेतला. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेनेचे आमदार योगेश कदम, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख, आमदार आशुतोष काळे, आमदार अतुल बनके, आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी एकाच वेळी भेट घेतली. तसेच शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था तयार करू जास्तीत जास्त समाज कार्य करा, असा सल्लाही यावेळी सर्व आमदारांना शरद पवारांनी दिल्याची माहिती आहे.

भाजपाच्या कार्यपद्धतीवर चर्चा

सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला महाविकास आघाडी तयार करून सत्यपासून आपण दूर ठेवले. यापुढेही भारतीय जनता पक्ष राज्याच्या सत्तेत येऊ देणार नाही, असे शरद पवारांनी या सर्व तरुण आमदारांना सांगितले. तसेच भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर शरद पवार यांनी टीका केली. मात्र भारतीय जनता पक्षावर टीका करत असताना देखील त्यांनी भाजपाकडून कोणत्या गोष्टी शिकण्याजोग्या आहेत, याचाही आवर्जून उल्लेख केला.

हेही वाचा - The Kashmir Files : राजीव गांधी काश्मिरी पंडितांच्या बाजूने अन् भाजप रथयात्रेत व्यस्त; काँग्रेसचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.