ETV Bharat / city

बारावी निकाल लावण्यासाठी शिक्षकांची होणार दमछाक - शिक्षणतज्ज्ञ

author img

By

Published : Jun 18, 2021, 4:10 PM IST

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच २८ जूनपर्यंत शाळांना डेटा पाठवायचा आहे. त्यामुळे शिक्षकांना १० दिवसात येवढ्या कमी कालावधीत डेटा पाठवतांना मोठ्या प्रमाणात दमछाक होणार असल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञ अनुभवा शहा यांनी दिली आहे.

बारावी परीक्षा निकाल
बारावी परीक्षा निकाल

मुंबई - कोरोनाच्या गंभीर परिस्थिती, मुलांमधील वाढता प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेची शक्यता इत्यादी बाबी विचारात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द केली आहे. आता बारावीचे मूल्यमापन करण्यासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ३०:३०:४० फॉर्म्युला तयार केला आहे. केंद्राच्या या कार्यपद्धतीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना तर दिलासा मिळाला आहे. मात्र, निकाल लावण्यासाठी शिक्षकांची मोठी दमछाक होणार असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बारावी निकाल प्रकरण

'दहा दिवसात डेटा पाठवणे अशक्य'

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बारावीच्या परीक्षांचे मूल्यांकन कसे करणार याबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते. मात्र, काल (गुरूवारी) सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या मूल्यांकन पद्धतीची माहिती दिली आहे. ज्यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे. यात दहावीच्या परीक्षेचे ३० टक्के गुण, अकरावीमधील ३० टक्के गुण आणि बारावीतील ४० टक्के गुणांचा समावेश असणार आहे. तसेच सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल 31 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच २८ जूनपर्यंत शाळांना डेटा पाठवायचा आहे. त्यामुळे शिक्षकांना १० दिवसात येवढ्या कमी कालावधीत डेटा पाठवतांना मोठ्या प्रमाणात दमछाक होणार असल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञ अनुभवा शहा यांनी दिली आहे.

असे होणार बारावीचे मूल्यमापन

बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या गुणवत्तेवर ठरणार आहे. ज्यामध्ये शेवटच्या तीन परीक्षा बारावीचे गुणपत्रिका बनविण्यासाठी अमलात आणल्या जातील. यामध्ये ३० गुण हे दहावीच्या पाच विषयांपैकी 3 विषयांचे उत्कृष्ट गुण घेऊन गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. तसेच ३० गुण हे अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेऊन दिले जाणार आहे आणि ४० गुण हे बारावी प्री बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे दिले जाणार आहे. त्यानुसार ३०:३०:४० फॉर्म्युला वापरून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकाल जाहीर करणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये कुठे नाराजी तर कुठे आनंद

सीबीएसई बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना दहावीत कमी गुण मिळाले आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांत चांगले गुण मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांनी मोठा परिश्रम करून सीबीएसईच्या बारावी परीक्षाची तयारी केली होती. मात्र, आता परीक्षा रद्द झाल्यामुळे आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन हे दहावी, अकरावी आणि बारावी या तीन वर्गांच्या गुणवत्तेवर ठरणार असल्याने विद्यार्थ्यांचा बारावीत कमी गुण मिळणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.

'हा' असेल विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय

विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीनुसार निकाल मान्य नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु झाल्यावर बारावीची परीक्षा देता येणार आहे. याशिवाय शाळेत ५ शिक्षकांची एक समिती तयार करण्यात येणार आहे. ही समिती बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याची तयारी करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुसरे बोर्डामधून सीबीएसई येणारे आणि राज्यातून ट्रांसफर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन त्यांच्या बोर्डाच्या गुणपत्रिकामधील गुणांच्या आधारे केला जाणार आहे. यामध्ये संबंधित शाळेला सीबीएसई वेबसाइटवर गुणपत्रिका अपलोड करावे लागणार आहे.

हेही वाचा -साडी नेसून व्यायाम करणाऱ्या महिलेचा झिंगाट व्हिडिओ व्हायरल.....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.