ETV Bharat / city

Cruise Drug : एनसीबीच्या कारवाईत सहभागी मनिष भानुशाली, के. पी. गोसावी नेमके कोण? - क्रुझ ड्रग कारवाई

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

viral photos
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो
author img

By

Published : Oct 6, 2021, 5:43 PM IST

Updated : Oct 6, 2021, 7:24 PM IST

मुंबई - मुंबईत एनसीबीने ३ ऑक्टोबरला मुंबई ते गोवा जाणाऱ्या क्रूझवर कारवाई केली होती. या कारवाईत बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांच्यासह आतापर्यंत १७ जणांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना पकडून एनसीबी कार्यालयात आणणाऱ्यांमध्ये भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईत खासगी व्यक्तींचा सहभाग कसा? असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला आहे.

कारवाई करतानाचा व्हिडिओ

हेही वाचा - एनसीबीने क्रूझवर घातलेल्या धाडीची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी!

  • क्रूझवरील कारवाईत खासगी व्यक्तींचा सहभाग -

मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर शनिवारी रात्री एनसीबीने कारवाई करत क्रूझवर चालणारी ड्रग्स पार्टी उधळली होती. या कारवाईवेळी आर्यन खान याला के. पी. गोसावी याने तर अरबाज मर्चंटला भाजपाचा पदाधिकारी असलेला मनीष भानुशाली याने पकडून आणले होते. त्याबाबतचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक स्पष्ट दिसत आहेत. आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून, तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली? याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे, असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

viral photos
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो

हेही वाचा - Cruise Drug Case : अरबाज मर्चंटला अटक करणारा भाजपचा नेता; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

  • के. पी. गोसावी कोण? -

मिळालेल्या माहितीनुसार, किरण म्हणजेच के. पी. गोसावी हा व्यक्ती देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के.पी.जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याचे समजते. के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. हा व्यक्ती बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी हा स्वतःच्या वाहनावर पोलिस असल्याची पाटी लावून फिरतो. के. पी. गोसावी यांच्याविरोधात 2018 मध्ये पुण्यातील तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मलेशियात नोकरीचं आमिष दाखवून 3 लाख उकळल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला होता, तशी बातमीही पुण्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. के.पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले.

viral photos
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो
  • मनिष भानुशाली कोण? -

अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. मुंबईमध्ये येण्यापूर्वी हा भानुशाली गुजरातच्या काही मंत्र्यांना भेटून आला होता. यामुळे या व्यक्तीचे गुजरातमध्ये उतरवण्यात आलेल्या ड्रग्सची संबंध आहे का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे.

viral photos
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेले फोटो
  • मी भाजपचा आम कार्यकर्ता -

मी भाजपचा आम कार्यकर्ता आहे. माझ्यावर जे आरोप लावले ते चुकीचे आहेत. मीच एनसीबीला ड्रग्स पार्टीबद्दल माहिती दिली होती. ती माहिती मला माझ्या मित्रांकडून समजली. मी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांना याबाबत याआधीही माहिती होती. माझ्याकडे माहिती जास्त असल्याने एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांनी मला बोलावून घेतले. तेव्हा मी एनसीबी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या गाडीमधून गेलो होतो. मी कोणालाही पकडून आणले नाही. माझी जबाबावर सही घेतल्यावर मी एनसीबी कार्यालयातून निघून आलो. पक्षाने देशाविरोधात काही होत असेल तर त्याविरोधात आवाज उचलला पाहिजे ही शिकवण दिली आहे. त्याप्रमाणे ड्रग्स घेणाऱ्यांची माहिती एनसीबीला दिली, असे स्पष्टीकरण मनिष भानुशाली याने दिले आहे.

Last Updated : Oct 6, 2021, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.