ETV Bharat / city

चार महिन्यात पश्चिम रेल्वेने कमविले पाच हजार कोटी - चार महिन्यात

पश्चिम रेल्वेने सुद्धा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्रत्येक विभागातून आणि प्रत्येक माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचे काम वेगात सुरू आहे.

रेल
रेल
author img

By

Published : Aug 24, 2021, 2:40 AM IST

मुंबई - पश्चिम रेल्वेने मागील चार महिन्यात प्रवासी वाहतूक, माल वाहतूक आणि इतर माध्यमातून तब्बल 5 हजार 33 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात 53 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामधील 80 टक्के कमाई एकट्या मालवाहतूकमधून झालेली आहे. तर उर्वरित 20 टक्के कमाई ही प्रवासी वाहतूक आणि इतर माध्यमातून करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली आहे.

5 हजार कोटी रुपयांचा उत्पन्नांचा टप्पा पार

कोरोना आणि सततच्या लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेचे मोठ्या प्रमाणात प्रवासी महसूल बुडाले आहे. सध्या कोरोचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने भारतीय रेल्वे रुळावर येत आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेचा तोटा भरून काढण्यासाठी आणि महसूल वाढवण्याकरिता मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. पश्चिम रेल्वेने सुद्धा महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्रत्येक विभागातून आणि प्रत्येक माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचे काम वेगात सुरू आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक करण्यासाठी अनेक आव्हानांशी सामना करून यंदा महसूलात वाढ केली आहे. 1 एप्रिल ते 21 ऑगस्ट या कालावधीत पश्चिम रेल्वेने एकूण 5 हजार 33 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 53 टक्क्यांची वाढ यात झाली आहे.

भारतीय रेल्वेत सर्वाधिक महसूल

प्रवासी, पार्सल आणि तिकिटांची तपासणी करत 100 टक्क्यांहून अधिक महसूलात वाढ केली आहे. मागील चार महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावरून एकूण 14 कोटी 30 लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर याच कालावधीत मागील वर्षी सुमारे 1 कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. परिणामी या वाढलेल्या प्रवासी संख्येच्या तिकिटांमधून रेल्वेला 4.16 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. हा महसूल भारतीय रेल्वेतील सर्व विभागातील सर्वाधिक महसूल आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मिळणाऱ्या महसूलात पश्चिम रेल्वे प्रथम स्थानावर आहे.

असा वाढला उत्पन्न

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले, की 1 एप्रिल ते 21 ऑगस्ट या कालावधीत पश्चिम रेल्वेने 285 पार्सल विशेष ट्रेन चालवून 1 लाख टनांहून अधिक वजनाच्या वस्तुंची वाहतूक करण्यात आली आहे. ज्यातून रेल्वेला 37.47 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या काळात पश्चिम रेल्वेद्वारे 50 हजार टनाहून अधिक वजनाच्या 72 मिल्क विशेष ट्रेन चालविण्यात आल्या. तर 85 कोविड-19 विशेष पार्सल ट्रेन चालवून 14 हजार 900 टन साम्रगीची वाहतूक करण्यात आली. यासह 25 हजार टन वजन वाहून नेणाऱ्या 53 इंडेंटेंड रेक चालविण्यात आले. तर, 18 हजार 600 टनांहून अधिक वजन वाहून नेणाऱ्या 75 किसान रेल्वे चालविण्यात आल्या आहे.

हेही वाचा - लसवंतांना लोकल प्रवासात मिळाली मुभा, मात्र फुकट्यांच्या गर्दीने भरतोय लोकलचा डबा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.