मुंबई - क्रूझ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी (अमली पदार्थ विरोधी पथक) कडून समुपदेशनाचे धडे देण्यास सुरुवात झाली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार हे समुपदेशनाचे धडे फक्त आर्यन खान यालाचं नाही. तर, प्रत्येक आरोपींना दिले जातात. विशेषतः लहान वयात जे युवा ड्रग्सच्या आहारी जातात त्यांना त्याच वयामध्ये त्याच्यातून बाहेर काढणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच त्यांचं समुपदेशन केले जाते.
याआधीही अभिनेत्यांना करण्यात आली अटक
या अगोदर सुद्धा बऱ्याच सेलिब्रिटीजना ड्रग्स प्रकरणांमध्ये अटक झाली आहे. तेव्हा त्यांचेही समुपदेशन करण्यात आल होत. परंतु ज्या पद्धतीने आर्यन खान या प्रकरणांमध्ये गुंतलेला आहे. हा गुंता सोडवण्यासाठी अभिनेता शाहरुख खान याने मोठ्यातले मोठे वकील सुद्धा दिलेले असताना आर्यन खान याला कोठडीतून बाहेर काढणे अशक्य झालेल आहे. अशात मानसिक तणाव मोठ्या प्रमाणामध्ये आर्यन खान वर आहे.
हेही वाचा - आर्यनच्या आरोग्याबद्दल जेलमधील अधिकारी चिंतेत