ETV Bharat / city

Mumbai Ward Formation : मुंबई नवीन प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा घोषित; शिवसेनेला होणार फायदा? - मुंबई मनपा प्रभाग रचना प्रारूप आराखडा

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने निवडणुका ( BMC Election 2022 ) होणार आहेत. मागील महापालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग रचना केल्यावर भाजपाला फायदा झाल्याने प्रभाग रचना बदलण्यात आली आहे. आज नवीन प्रभाग रचना प्रारूप आराखडा सादर ( New Ward Formation Draft ) करण्यात आली. यावर हरकत नोंदवायची असल्यास १४ फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Feb 1, 2022, 10:58 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने निवडणुका ( BMC Election 2022 ) होणार आहेत. मागील महापालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग रचना केल्यावर भाजपाला फायदा झाल्याने प्रभाग रचना बदलण्यात आली आहे. नव्या प्रभाग रचनेनुसार मुंबईत ९ प्रभाग ( New Ward Formation Draft ) वाढणार आहेत. त्यामधील ६ मतदार संघात शिवसेनेचे तर ३ मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत. यामुळे प्रभाग रचनेच्या माध्यमातून शिवसेनेचा फायदा होणार आहे.

१४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती -

मुंबई महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापालिकेतील प्रभागांची संख्या ९ने वाढवली आहे. यामुळे पालिकेतील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. प्रभाग वाढल्याने प्रभाग रचनेत बदल करण्यात आला आहे. बहुतेक प्रभागांच्या सीमा बदललेल्या आहेत. नव्या प्रभाग रचनेचा नकाशा पालिकेने आपल्या वेब पोर्टलवर टाकला असून त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागवल्या आहेत. १६ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे. प्रभाग रचनेचा अहवाल २ मार्चला पालिकेकडून निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.

शिवसेनेला फायदा? -

नव्या प्रभाग रचनेनुसार एफ दक्षिण परेल, जी दक्षिण वरळी, ई प्रभाग भायखळा, आर उत्तर दहिसर, के पूर्व आणि एच पूर्व मिळून अंधेरी पूर्व, आर साऊथ कांदिवली, एल प्रभाग कुर्ला, एन प्रभाग घाटकोपर, एम पूर्व चेंबूर या प्रभागात एक प्रभाग वाढणार आहे. आर उत्तर, के पुर्व, एल, एन, एफ दक्षिण, जी दक्षिण या सहा प्रभागांमध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या जास्त आहे. आर दक्षिण, एम पश्‍चिम या दोन प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे. तर ई प्रभागात समिश्र परीस्थीती आहे. ९ प्रभागांपैकी ६ मध्ये शिवसेनेचे तर ३ प्रभागांमध्ये भाजपाचे आमदार आहेत.

हेही वाचा - Union Budget 2022 : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडणार नाही : अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.