ETV Bharat / city

Maha Voting : राज्यभरात 'या' ठिकाणी झालेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड - maharahstra elections 2019

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर जोरदार तयारी करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.

राज्यभरात काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा येत आहे.
author img

By

Published : Oct 21, 2019, 1:03 PM IST

Updated : Oct 21, 2019, 5:12 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर जोरदार तयारी करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.

वरळी मतदार संघातील 52 चाळ येथील 62 नंबर मतदान केंद्रातील 3 ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्या बदलण्याचे काम या केंद्रात सुरू झाले आहे.

लातूर
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बूथ क्र.249 वर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या दीड तासापासून मतदान प्रक्रिया बंद आहे. काही ठिकाणी महिला मतदार मतदान न करताच घरी निघून गेल्याचे चित्र आहे.

1132 पैकी 449 मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जळकोट तालुक्यातील मरसंगवी गावातील बूथ क्र.104 वरील मशीन काम करत नसल्याने एक वाजल्यापासून मतदान बंद आहे. मशीनच्या केबल काम करत नसल्याने मतदान बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

मरसंगवी गावात एकूण 3 मतदान केंद्र असून, जिल्हा परिषद शाळेत असलेले मतदान केंद्र क्र.104 वरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान थांबले. मशीनमध्ये बिघाड होण्यापूर्वी 300 मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. या केंद्रावर एकूण 956 नोंदणीकृत मतदान आहे. तात्काळ मशीन दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे.

सांगली

इस्लामपूर(283) विधानसभा मतदारसंघातील साखराळे येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बुथवरील ईव्हीएम मशीन 45 मिनिटे बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यानंतर जयंत पाटील यांनी प्रशासनाकडे वाया गेलेली वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने नकार दिला आहे.

हे चुकीचे असून मतदान प्रक्रिया ही लोकांच्या सोई साठी आहे; की सरकारच्या सोईसाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच दुपारनंतर पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवण्यात आल्याने मतदान कमी होऊ शकते. यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.

उस्मानाबाद

पावसातही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक येत आहेत. मात्र, ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया रेंगाळी असून, उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील डिकसळ येथे मतदारांना वाट पाहावी लागली. या मतदान केंद्रावर 660 मतदार संख्या असलेले बूथ क्रमांक 55 मधील मतदान यंत्र अर्धा तास बंद होते. काही वेळानंतर मशीन पुन्हा सुरू करण्यात आल्याने मतदान सुरळीत झाले आहे.

अमरावती

चांदूर-रेल्वे तालुक्यामधील येरड मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने तब्बल दीड तास मतदान बंद होते. यामुळे मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्या होत्या. उशिरा मतदान सुरू झाल्याने वेळ वाढवून देण्याची मागणी मतदारांनी केली आहे.

जालना

जालना विधानसभा मतदार केंद्रातील सेंट मेरी हायस्कूल येथे 57 क्रमांकाच्या मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धा तास मतदारांचा खोळंबा झाला. याच केंद्राच्या बाजूला अन्य मतदान केंद्र असल्यामुळे नागरिकांची गर्दी झाली. काही काळ रांगेमध्ये ताटकळलेल्या ज्येष्ठ मतदारांनी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारातच ठिय्या दिला.

मात्र, मतदान केंद्र अध्यक्षांनी वरिष्ठांशी संपर्क साधून पंधरा मिनिटातच दुसरी मशीन मागवून घेतली. संबंधित मशीन सोबत तांत्रिक काम करणारा इंजिनिअर न आल्यामुळे मतदारांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम सुरू केले. अर्धा तास हा प्रकार चालू राहिल्यानंतर पोलीस प्रशासनाने मतदारांची समजूत काढली.

वर्धा

हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथे मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद पडली होती. यामुळे जवळपास दीड तास मतदान प्रक्रिया उशिराने सुरू झाली. मतदान केंद्रावर संबंधित तांत्रिक बिघाड दुरुस्त करून व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. तसेच याच मतदारसंघातील अन्य सहा केंद्रांवरही मॉक पोलच्या वेळी व्हीव्हीपॅमध्ये बिघाड झाला होता.

चंद्रपूर

गोंडपिपरी तालुक्यातील सोमणपल्ली मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने दोन तासापासून मतदान ठप्प आहे. सलग तीन वेळा मतदान यंत्रात बिघाड झाला. रांगेत असलेल्या मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला असून, काही नागरिक मतदान न करताच घरी परतले.

रत्नागिरी

चिपळूणमधील कापसाळ येथील शाळा क्र. 2 या मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सकाळी 7 वाजता बंद पडली. त्यानंतर तासाभराने नवीन मशीन देण्यात आली तसेच याच पद्धतीने कापसाळ शाळा नं.1 येथील 178 मतदान केंद्रातील मशीन मध्येही काही वेळासाठी तांत्रिक बिघाड झाला होता.

रायगड

पनवेल विधानसभा मतदारसंघातील तळोजा मतदान केंद्र-35 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाचे वातावरण आहे. प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. या मतदान केंद्रात पहिल्या 19 जणांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन बिघडले. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती.

हिंगोली

सेनगाव तालुक्यातील चापडगावमधील मतदान केंद्रावर दोन तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याने खोळंबा झाला होता. नऊ ते अकरा या वेळात हे यंत्र बंद पडले. बंद पडण्यापूर्वी या यंत्रावर चोवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन तासाच्या विलंबानंतर बंद पडलेले यंत्र दुरुस्त करण्यात आले.

बुलडाणा

चिखली मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मतदान केंद्र 196 मधील ईव्हीएम मशीन दुपारी एक वाजे पासून बंद पडली. जवळपास तासभर ही मशीन बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Intro:Body:

seffse

Conclusion:
Last Updated : Oct 21, 2019, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.