ETV Bharat / city

अन्यायाविरोधातील हा लढा होता, न्यायासाठी दादरा-नगर हवेलीचा विजय महत्त्वाचा - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Nov 4, 2021, 9:56 AM IST

Updated : Nov 4, 2021, 10:43 AM IST

दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर या ४७ हजारांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा होतीच, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

अन्यायाविरोधातील हा लढा होता, न्यायासाठी दादरा-नगर हवेलीचा विजय महत्त्वाचा - आदित्य ठाकरे
अन्यायाविरोधातील हा लढा होता, न्यायासाठी दादरा-नगर हवेलीचा विजय महत्त्वाचा - आदित्य ठाकरे

मुंबई - दादरा नगर-हवेली या पोटनिवडणुकीत झालेल्या विजयानंतर शिवसेनेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली ओळख आता बदललेली आहे. शिवसेना राष्ट्रीय स्तरावरती सक्रिय होण्यासाठी सज्ज झाली आहे. दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर या ४७ हजारांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा होतीच, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसेनेने भाजपचा केला पराभव

शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांना 1 लाख 12 हजार 741 मते मिळाली. तर त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली. डेलकर यांनी 47 हजार 447 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.

न्यायासाठी हा विजय महत्त्वाचा होता..

लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील दमदार विजयानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजय याबाबत बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, दादरा नगर-हवेलीत शिवसेनेचा मोठा विजय झालाय. पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढवणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये टॉप फाईव्हमध्ये येत असतात. मुख्यमंत्री सर्व मित्र पक्ष आणि प्रशासनाला सोबत घेऊन काम करत आहेत, त्यामुळे याचं श्रेय सर्वांचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

पहिलेच सीमोल्लंघन -

तीस वर्षांपूर्वी 1990 साली उत्तर प्रदेश मध्ये पवन पांडे हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर करिष्मा दाखवता आला नव्हता. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचे हे पहिलेच सीमोल्लंघन ठरले आहे.

हेही वाचा : दादरा नगर हवेलीच्या नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकरांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

Last Updated : Nov 4, 2021, 10:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.