मुंबई - शिवसेना ( Shiv Sena ) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटा ( Eknath Shinde Group ) मध्ये शेवटच्या क्षणी सामील झालेले हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर ( MLA Santosh Bangar ) यांनी विधानभवनातून बहूमत चाचणीनंतर धावता पाय काढला. भाषणानंतर विधानभवनाच्या बाहेर निघताना त्यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. पण त्यांनी माध्यमांना सामोरे न जाता अगदी थोडक्या शब्दात सवाद संपवला.
एकनाथ शिंदे शिवनसेनेशी एकनिष्ठ - बाळासाहेबांचे शिवसैनिक शिवसेनेशी कधीच वाकडे घेणार नाहीत. ते शिवनसेनेशी एकनिष्ठ आहेत. श्वासाच्या शेवटपर्यंत राहणार असं त्यांनी सांगितलं होतं. सध्या त्यांचे बंडखोर आमदारांविरोधातले वक्तव्य चर्चेत आहे. जे बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले आहेत. ते आमदार परत आल्यानंतर त्यांच्या बायका सुद्धा त्या आमदारांना घरात घेणार नाहीत, अशा पद्धतीचे वक्तव्य सुद्धा हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसापूर्वी केले होते. परंतू एकंदरीत अशी काय घडामोड झाली? की संतोष बांगर हे सुद्धा शिंदे गटांमध्ये सामील झाले हे अजून गुलदस्त्यातच आहे. आज विधानभवनातून विश्वास दर्शक ठराव पारित झाल्यानंतर बाहेर पडत असताना त्यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांनी फार काही न बोलता एकनाथ शिंदे हे आज मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला फार आनंद असून ते योग्य प्रकारे नेतृत्व करतील असे सांगितले आहे.
आमदार संतोष बांगर गहीवरले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणामुळे हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर गहीवरले होते. त्यांच्या डोळ्याच अश्रू पहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM Eknath Shinde ) सभागृहात अतिशय सूंदर भाषण केले असे संतोष बांगर म्हणाले. बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असावा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असे आमदार संतोष बांगर म्हणाले. आणि विधानभवनातून बहुमत चाचणीनंतर धावता पाय काढला.
आमदार संतोष बांगर वक्तव्य - जे बंडखोर आमदार गुवाहाटीला गेले आहेत. ते आमदार परत आल्यानंतर त्यांच्या बायका सुद्धा त्या आमदारांना घरात घेणार नाहीत, अशा पद्धतीचे वक्तव्य हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसापूर्वी केले होते. मात्र, आता तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये शेवटच्या क्षणी सामील झालेल्याने राजकीय वर्तूळात आश्चर्य व्यक्त केल जात आहे.
हेही वाचा - CM Eknath Shinde: मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आमदारांसह ठाण्यात; मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन