ETV Bharat / city

Heart Surgery on Two Months Baby : मुंबईत दोन महिन्याच्या बाळाची शस्त्रक्रिया करत हृदयाचे छिद्र बंद, देशातील पहिलीच घटना - J.J. Hospital Mumbai

केवळ दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयातील छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली ( Heart Surgery on Two Months Baby ) आहे. ही शस्त्रक्रिया हृदय न उघडत ( Ventricular Septal Defect ) जे.जे. रुग्णालयातील ( J.J. Hospital Mumbai ) वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही देशातील पहिली व जगातील दुसरी घटना ( First in India ) आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेकांनी या शस्त्रक्रियासाठी नकार दिला होता. मात्र, मुंबईत ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. यासाठी बाळाच्या पालकांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा ( Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana ) लाभ घेतला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 27, 2021, 9:04 PM IST

मुंबई - केवळ दोन महिन्याच्या बाळाच्या हृदयातील छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया हृदय न उघडत जे.जे. रुग्णालयातील ( J. J. Hospital Mumbai ) वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे. ही देशातील पहिली व जगातील दुसरी घटना आहे. शस्त्रक्रिया झालेले बाळ मुळचे कर्नाटक येथील असून कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेकांनी या शस्त्रक्रियेस नकार दिला होता. मात्र, मुंबईतील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

बोलताना डॉक्टर व बाळाचे वडील

देशातील पहिलीच घटना

बाळाच्या पायाच्या नसामधून हृदयापर्यंत एक विशिष्ट नळी टाकून या बाळाचे छिद्र बंद करण्यात आले आहे. इतक्या लहान बाळाच्या हृदयातील छिद्र अशाप्रकारच्या शस्त्रक्रियेने बंद करण्यात आल्याची देशातील पहिली ( First in India ) आणि जगातील दुसरी घटना आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉ. कल्याण मुंडे यांनी कार्तिक राठोड या दोन महिन्यांच्या बाळावर ही शस्त्रक्रिया केली आहे.

6 मिलीमीटरचे होते छिद्र, अनेकांनी शस्त्रक्रियेस दिला नकार

व्हेन्ट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट ( Ventricular Septal Defect ), असे या शस्त्रक्रियेचे नाव आहे. बाळाच्या हृदयाला 6 मिलीमीटर इतके छिद्र होते. बाळाचे पालक कर्नाटकचे असून कर्नाटक आणि मुंबईतील अनेक रुग्णालयातील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक असल्याने बाळावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. बाळाचे वजन केवळ साडेतीन किलो असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे धोकादायक होते. या बाळाच्या हृदयाला जन्मतः छिद्र असल्याने बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. बाळाला दूध पिता येत नव्हते आणि झोपही येत नव्हती. मात्र, आता त्याच्या हृदयातील छिद्र बंद करण्यात आल्याने बाळ ठणठणीत बरे झाले आहे. आता तो दूध पितो, व्यवस्थित श्वास घेत असून झोपही घेत आहे.

'या' याजनेमुळे शस्त्रक्रिया झाली मोफत

या शस्त्रक्रियेसाठी कमीतकमी 5 लाख रुपये खर्च येतो. मात्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ( Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana ) या योजनेच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. बाळाचे वडील बांधकाम मजूर असून बाळ आता ठणठणीत बरे झाल्याने कार्तिकचे आई-बाबा आनंदित आहेत.

हे ही वाचा - Salman Birthday Video : सलमान खानने सांगितला साप चावल्याचा किस्सा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.