ETV Bharat / city

कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी - डॉ. अविनाश भोंडवे - कोरोना लसीकरण

कोरोना उपचार पद्धती आणि कोरोना लसीकरणाबाबत रोज नवनवीन नियम, माहिती समोर येताना दिसते. त्यानुसार आता कोरोनामुक्त झालेल्यांना लस घेण्याची गरज नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. पण नागरिकांनी न गोंधळता कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले आहे.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Jun 14, 2021, 4:02 PM IST

Updated : Jun 14, 2021, 7:37 PM IST

मुंबई - कोरोना उपचार पद्धती आणि कोरोना लसीकरणाबाबत रोज नवनवीन नियम, माहिती समोर येताना दिसते. त्यानुसार आता कोरोनामुक्त झालेल्यांना लस घेण्याची गरज नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. पण नागरिकांनी न गोंधळता कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले आहे. लस घेतल्याने कोरोनाच्या सर्व प्रकारच्या स्ट्रेनविरोधात लढण्यासाठीच्या अँटिबॉडीज तयार होतात. त्यामुळे ही लस घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये 'इतके' दिवस टिकतात अँटिबॉडिज

कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज नेमक्या किती दिवस टिकतात याबाबत वेगवेगळी माहिती समोर येते. काहीच्या म्हणण्यानुसार या अँटिबॉडीज तीन महिने तर काहींच्या म्हणण्यानुसार सहा महिने, नऊ महिने टिकतात. मात्र आयसीएमआरच्या एका अभ्यासानुसार तीन महिने टिकतात त्यानंतर त्या कमी होण्यास सुरुवात होते, असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घेणे आवश्यक असल्याचे भोंडवे यांनी सांगितले.

'कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी'

लसीचे दोनही डोस घेण्याचे आवाहन

कोणत्याही आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्या आजाराविरोधात लढणारी लस घ्यावी लागते. ही लस घेतल्यानंतर संबंधित आजाराविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडिज तयार होतात, या अँटिबॉडीज कायमस्वरूपी शरीरात रहातात. एखाद्या व्यक्तीला तो आजार झाल्यास त्याच्या शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होतात व त्या कायमस्वरूपी राहात. मात्र कोरोनाच्या बाबतीत तसे होत नाही, कोरोनामुक्त झाल्यास त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात, मात्र त्या केवळ तीन महिनेच राहातात, म्हणून कोरोना लस घेणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे ज्या व्हेरीयंटचा कोरोना झाला आहे, त्या व्हेरीयंटविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात तयार होतात. त्या इतर व्हेरीयंटचा सामना करण्यास कमी पडतात. त्यामुळे सर्व व्हेरीयंटविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडिजसाठी लस हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी तीन महिन्यानंतर कोरोनाची लस घ्यावी, लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 82 ते 112 दिवसांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन डॉ. भोंडवे यांनी केले आहे.

हेही वाचा - राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत

Last Updated : Jun 14, 2021, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.