ETV Bharat / city

शरद पवारांकडून शिकण्याची प्रेरणा मिळत राहील- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ऊर्मिला मातोंडकर यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच, मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

urmila matondkar wishes ncp leader sharad pawar on his 80th birthday
शरद पवारांकडून शिकण्याची प्रेरणा मिळत राहील- उर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Dec 12, 2020, 2:23 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावत शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उर्मिला मातोंडकर

शरद पवारांकडून शिकण्याची प्रेरणा मिळत राहील -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्यांचा राजकीय क्षेत्रातील अत्यंत दीर्घ अनुभव आणि त्यांचे एकूण योगदान लक्षात घेता त्यांच्याकडून मला राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात शिकण्याची प्रेरणा मिळत राहील. त्यांचे आशीर्वादही असतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच उर्मिला मातोंडकरांचा शिवसेनेत प्रवेश -

शरद पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. समाजकारण, राजकारण, कृषी आधीच सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची मातब्बरी आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. असेही त्या म्हणाल्या. मागील आठवड्यातच ऊर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हेही वाचा - तस्करी केलेले मूल घेतले दत्तक, न्यायालयीन लढा देत पुन्हा मिळवला मुलाचा ताबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.