मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Narayan Rane Admitted to Lilavati Hospital) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ते मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ते रुटीन चेकअपसाठी गेले असताना त्यांना डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यानंतर त्यामध्ये काही ब्लॉकेजेच आढळून आले. म्हणूनच त्यांच्यावर आजच अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी एक स्टेन टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोन-तीन दिवसांत, त्यांची तब्येत पाहून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही - संभाजी राजे