मुंबई - मशीनचे पार्ट, बटणे, शिवणकामाची मशीन, धातूचे सामान यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात चीनकडून आयात केल्या जातात. मात्र चिनी आयातीवर भारताची अघोषित बंदी कायम राहिल्यास वस्त्र उद्योगावर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता या अघोषित आयातबंदीमुळे उत्पादक वस्तूंच्या प्रतीक्षेत आहेत.
काही वस्तूंसाठी पर्याय उपलब्ध असताना, इतर केवळ चीनमध्ये बनवलेले आहेत. ते वैकल्पिकरित्या तुर्की, व्हिएतनाम, थायलंड किंवा तैवानमधून आयात केल्या जाऊ शकतात. परंतु काही मशीनचे स्पेयर केवळ चीनमध्ये उपलब्ध असल्याने उत्पादकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एका निर्मात्याने सांगितले, की ब्रँडिंगचे टॅग्ज आणि मटेरियल, झिपर्स आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी खास बटणे चीनमधून उत्पादित केली जातात. आता उत्पादकांना चीन व्यतिरिक्त दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत (एलएसी) दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये झटापट झाल्यानंतर भारताने चिनी वस्तू व उत्पादनांवर अघोषित आयातबंदी घातली. पंतप्रधान मोदींनी वोकल फॉर लोकलचा नारा दिला आणि प्रत्येक भारतीय चीनी वस्तूचा बहिष्कार करायला प्रोत्साहित झाला. ज्या चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तू आता बंदर आणि विमानतळ यासारख्या प्रवेशाच्या ठिकाणी कस्टम डिपार्टमेंटच्या 100 टक्के मॅन्युअल चेकच्या प्रक्रियेतून जातात. सरकारने अमेरिका आणि दक्षिण कोरियन कंपन्यांनी ऑर्डर केलेला माल असेल, तर अशा मॅन्युअल चेकिंग प्रक्रियेतून जावं लागत नाही.