ETV Bharat / city

'कामगारांनी स्थलांतर करू नये, त्यांची सर्व व्यवस्था सरकार करणार' - corona in mumbai

कोरोना विषाणुच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर तसेच कामगारांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

uddhav thackeray on corona
'कामगारांनी स्थलांतर करू नये, त्यांची सर्व व्यवस्था शासन करणार'
author img

By

Published : Mar 28, 2020, 11:48 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर तसेच कामगारांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या मजुरांच्या आरोग्याची काळजी सरकार घेणार असून त्यांच्य जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगारांचे आरोग्य, जेवण तसेच त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.