ETV Bharat / city

Uddhav thackeray on ShivSena Dussehra Gathering शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार- उद्धव ठाकरे - uddhav thackeray

अवघ्या शिवसैनिकांचे डोळे लागून असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच (ShivSena Dussehra Gathering on Shivtirtha) घेणार, अशी भूमिका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मांडली आहे. आता मुख्यमंत्री नसल्याने बोलण्यावर बंधन राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात मातोश्रीवर बैठक पार पडली. बैठकीला अरविंद सावंत, भास्कर जाधव हे उपस्थित होते.

Shiv Sena's Dussehra gathering will be held at Shivtirtha - Uddhav Thackeray
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार-उध्दव ठाकरे
author img

By

Published : Sep 6, 2022, 5:31 PM IST

Updated : Sep 6, 2022, 6:48 PM IST

मुंबई - आता आपण मुख्यमंत्री नाही त्यामुळे आपल्या बोलण्यावर कोणतेही बंधन नाही. आधी मुख्यमंत्री असल्याने आपल्या तोंडावर मास्क होता. मात्र आता तो उतरला आहे त्यामुळे दसरा मेळाव्यात आपल्याला जे हवं आहे ते आपण बोलणार आहोत, असा इशारा बंडखोरांना आणि भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिला. तसेच शिवसेनेचा दसरा मेळावा (shivsena dussehra gathering) हा शिवतीर्थावरच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार- उध्दव ठाकरे

केंद्रीय मंत्री अमित शाह (amit shah mumbai visit) यांचा काल मुंबई दौरा होता. या मुंबई दौऱ्यात त्यांनी लालबागच्या राजासह आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचेदेखील दर्शन घेतलं. तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची एक बैठकही घेतली आणि या बैठकीत शिवसेनेने आपल्याला धोका दिला असून, या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना जमीन दाखवा असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. मात्र, यावर आज उद्धव ठाकरे यांनी बोलताना "काल मंगलमूर्ती आणि अमंगलमुर्ती असे दोन्हीही दिसले." अशी प्रतिक्रीया दिली.

मुठभर निष्ठावंत असलेली लोक बरी हा शिवसेनेचा संघर्षाचा काळ आहे. या संघर्षाच्या काळात जो सोबत राहील तो आपला आहे. आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना आमिष दाखवून ते नेऊ शकले असते. कारण त्या आमदारांमध्ये निष्ठा आहे. आणि कितीही किंमत दिली तरी निष्ठा विकली जाऊ शकत नाही. पसाभर नासलेली लोक असण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत असलेली लोक बरी असा टोलाही बंडखोरांना उद्धव ठाकरे यांनी लगावला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीवेळी नेत्यांशी संवाद साधताना भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांनीही टोले लगावले. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कर जाधव, सुनील प्रभू अनिल परब हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाचा आपल्याला कधीही मोह नव्हता आपल्याला मुख्यमंत्री पदाचा कधीही मोह नव्हता. ज्यावेळेस बंडखोरी झाली त्यानंतर ही आपल्या सोबत तीस ते पस्तीस आमदार होते. जर मुख्यमंत्रीपदाचा आपल्याला मोह असता तर, त्या सर्व आमदारांना डांबून ठेवलं असतं. जमल्यास त्या सर्व आमदारांना पश्चिम बंगालमध्ये देखील घेऊन गेलो असतो. मात्र आपल्याला केवळ निष्ठावंत शिवसैनिक आणि नेते आपल्या सोबत हवे आहेत. त्यामुळे त्यावेळीही आपण सांगितले ज्यांना राहायचं त्यांनी आपल्या सोबत राहावं. आपल्याला कधीही मुख्यमंत्री पदाचा मोह नव्हता म्हणूनच आपण तात्काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Last Updated : Sep 6, 2022, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.