ETV Bharat / city

प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून या; मुख्यमंत्र्यांचे छात्रसैनिकांना आवाहन

author img

By

Published : Jan 15, 2021, 2:42 AM IST

देशाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावरील ध्वजसंचलनामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे दिल्ली येथे शिबीरात सहभागी होणाऱ्या छात्रसैनिकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात तुम्हाला संपूर्ण जग बघणार आहे. तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक यावा, याच जिद्दीने तुम्ही पाऊल टाकावे. प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून विजयी भव: असा मंत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छात्रसैनिकांना दिला.

देशाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावरील ध्वजसंचलनामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी दुरदृश्यप्रणालीद्वारे दिल्ली येथे शिबीरात सहभागी होणाऱ्या छात्रसैनिकांशी संवाद साधला.

हेही वाचा-'जिजाऊ माँसाहेब प्रेरणेचा अखंडीत स्त्रोत' - मुख्यमंत्री ठाकरे

जिद्द ठेऊन भरारी घ्या-

तुमच्या पंखांमध्ये शिक्षक व मार्गदर्शकांनी बळ दिले आहे. आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असे आवाहन करतानाचा विजयी भव:चा मंत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला.

हेही वाचा-'बर्ड फ्लूचे माणसांमध्ये संक्रमण होत नसल्याने घाबरू नये'

पालकांना मुजरा -
मुख्यमंत्री ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकातूनच पुढे काही देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतात. तेव्हा मात्र, ज्यांना तिळगुळाची भाषा समजत नाही, त्यांना सडेतोड भाषेत उत्तर द्यावे लागेल. हे माझ्या छात्रसैनिकांनी नक्कीच माहित आहे. भारतात सैनिकी शिक्षण सक्तीचे नाही. तरीही राष्ट्रीय छात्र सेना हे जगातील एक मोठे छात्रसेना संघटन आहे. कित्येकदा आपल्या पाल्यांने मात्र नीटनेटके आणि चाकेरीबद्ध आयुष्य जगावे, असे अनेक पालकांना वाटते. अशा परिस्थितीतही आपल्या पाल्यांना छात्र सेनेत सहभागी होण्याच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या पालकांना मुजरा करतो.

दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्रसेनेचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, संचालक सतपाल सिंह आणि दिल्ली येथे प्रशिक्षण शिबीरातील राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.