ETV Bharat / city

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मोहन भागवतांवर टीका; म्हणाले 'हाच महिला शक्तीचा आदर का?' - Dussehra Melawa

महिलांचे खून होता आहेत, हा महीला शक्तिचा ( Dussehra Melawa ) आदर आहे का? कुठे महिला शक्तिचा अपमान केला जातो हा तुमचा आदर आहे का? असा सवाल त्यांनी मोहन भागवत ( Sadhana target on Mohan Bhagwat ) यांना विचारला.

Dussehra Melawa
Dussehra Melawa :
author img

By

Published : Oct 5, 2022, 8:38 PM IST

Updated : Oct 5, 2022, 11:02 PM IST

मुंबई - महिलांचे खून होता आहेत, हा महिला शक्तिचा ( Dussehra Melawa ) आदर आहे का? कुठे महिला शक्तिचा अपमान केला जातो हा तुमचा आदर आहे का? असा सवाल त्यांनी मोहन भागवत ( Sadhana target on Mohan Bhagwat ) यांना विचारला. बिलकिस बानोवर बलात्कार झाला. तिच्या मुलीचा आपटून खून केला. आरोपी पकडले. शिक्षा भोगत होते.

Uddhav Thackeray

त्यांना गुजरात सरकारने सोडून दिले. मात्र, गावी गेल्यानंतर त्यांचा सत्कार करून स्वागत केले. जी शिकवण शिवरायांनी दिली. कल्याणच्या सुभेदाराची खणानारळाने ओटी भरणारे शिवराय. हे शिकवण देणारे आमचे हिंदुत्व आहे. हे तुम्ही सांगावं गद्दारींनी नाही. काय कमी केलं त्यांना. बाप मंत्री, कार्ट खासदार, कुणाचं आमदार. हे डोळे लावून बसलेत. नातू नगरसेवक. सर्व काही एकच. माझ्याचकडे पाहिजे. मी का मुख्यमंत्री झालो. का केली आघाडी, ही लपून ठेवण्याची गोष्ट नाही. भाजपने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली.

मी हिंदुत्व सोडलं असेल. तुम्ही सांगा मी हिंदुत्व सोडलं. सोडलं मी हिंदुत्व. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सात जणांत त्याचाही मान राखला. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीवाले मांडीला मांडी लावून बसलेत दिसलं नव्हतं का ? की स्वत:ची दाढी स्वत:च्या तोंडात गेली होती का बोलला नाही तेव्हा? अमित शहांसोबत ठरलं होतं. पण त्यांनी नकार दिला. मी शिवरायांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. जे मी बोललो तसंच घडलं होतं.

देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का? काश्मीरमधलीच ती एक घटना आहे. औरंगजेब नावाचा लष्करात एक गनमॅन होता. त्याचे अपहरण करण्यात आले. काही दिवसांनी त्याचे प्रेत आपल्या सैन्याला मिळाले. त्याला हालहाल करून मारले. मुसलमान अतिरेक्यांनी त्याला मारले. तो भारताच्या बाजूने लढतोय म्हणून त्याला मारले. तो औरंगजेब आमचा भाऊ आहे. हे आमचे हिंदुत्व आहे.

Last Updated : Oct 5, 2022, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.