ETV Bharat / city

स्वयंशिस्त अन् सरकारी सूचना पाळणे आवश्यक, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन - लॉकडाऊन संबंधीच्या बातम्या चुकीच्या

घराबाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 12, 2020, 2:55 PM IST

Updated : Jun 12, 2020, 3:29 PM IST

मुंबई - आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरू करत आहोत. लॉकडाऊन पण उठवतो आहोत. याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे असा नाही. त्यासाठी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

घराबाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. सवय होईपर्यंत त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांना स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगीकारावी लागेल. राज्यातील जनतेला स्वयंशिस्त ही पाळावीच लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात परत लॉकडाऊन लागू करून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांना मात्र स्वयंशिस्त पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. याबाबत कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा स्वरूपाच्या बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात, त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 12, 2020, 3:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.